Balasaheb Thorat : देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा; बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगाला टोला

Balasaheb Thorat

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Balasaheb Thorat काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.Balasaheb Thorat

कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना कथितपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. थोरात यांनी मंगळवारी आयोजित एका पत्रकार परिषदेद्वारे या धमकीवर भाष्य केले. तसेच आपली आपल्या विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, आपण वारकरी संप्रदायातील आहोत. या वारकरी संप्रदायातील जे कीर्तनकार असतात, त्याला आपण हभप म्हणतो. त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये. कुणाचीही बाजू घेऊन बोलू नये. राज्यघटनेतील मुलभूत तत्वांना ठेच पोहोचेल असे कोणतेही विधान कीर्तनकारांनी करू नये. कारण, ही राज्यघटना आपल्या संतांच्या विचारांतूनच तयार झाली आहे. त्यामुळे यासंबंधी बोलताना पथ्य पाळले पाहिजे. पण दुर्दैवाने सध्या हे पथ्य पाळले जात नाही.Balasaheb Thorat



अशा महाराजांना राज्यघटनेवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. ते जी मांडणी करतात, ती अत्यंत दुर्दैवी प्रकारची आहे. त्यामुळे त्यांनी राज्यघटनेतील मुलभूत तत्वांवर नकारात्मक टिप्पणी करू नये.

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा दबावाखाली

ते पुढे म्हणाले, संग्राम भंडारे आपल्या कीर्तनात मूळ विषय सोडून दुसरेच काहीतरी बोलत होते. स्थानिक राजकारणावर भाष्य करत होते. त्यामुळे एका तरुणाने त्याचा विरोध केला. त्याने त्यांना केवळ अभंगावर बोलण्याची विनंती केली. त्यानंतर महाराज खूपकाही बोलले. त्यांनी त्या तरुणावरच टीका केली. हे तथाकथित महाराज आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण राजकारण करण्यासाठी या क्षेत्रात शिरलेत.

पोलिस या प्रकरणी दबावाखाली काम करत आहेत. पोलिस यंत्रणेने निष्पक्षतेने काम केले पाहिजे. कारण, ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. पण दुर्दैवाने ही यंत्रणा आज कुणाच्या तरी फोनमुळे दबावाखाली काम करत आहे. हा दबाव येथे अशांतता निर्माण करण्याचा एक भाग आहे. जे युवक पुढे येतील, त्यांचा छळ करण्यासाठी हे सुरू आहे. त्या ठिकाणी हजर नसलेल्या तरुणांवरही या प्रकरणी कारवाई केली जात आहे, असे थोरात म्हणाले.

संग्राम भंडारेंना कोणतीही धक्काबुक्की झाली नाही

थोरात पुढे म्हणाले, या महाराजांना कुणीही धक्काबुक्की केली नाही. त्यांची गाडीही फोडली नाही. पण त्यानंतरही या प्रकरणी खोटेनाटे गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी व हे महाराज संगमनेर तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कुणाच्या तरी इशाऱ्यावर का करत आहरेत. हे लोक संपूर्ण महाराष्ट्रभर अशी विधाने करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्याविरोधात नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणून मला धमकी दिली जात आहे. मी महात्मा गांधी नाही, पण विचारांसाठी लढणारा आहे. या विचारांसाठी माझी आनंदाने बलिदान स्वीकारण्याची तयारी आहे.

राजकारणाच्या स्तराने तळ गाठला

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशातील राजकारणाचा स्तर घसरल्याचाही आरोप केला. सद्यस्थितीत देशातील राजकीय पातळी घसरली आहे. माजी उपराष्ट्रपती अजून सापडत नाहीत. देशाचे माजी निवडणूक आयुक्तही गायब झालेत. सध्या सूडाचे राजकारण सुरू आहे. राज्याची पातळी तर फारच घसरली आहे. त्याने आता तळ गाठला आहे. राज्यातील आमदार कसेही वागत आहेत. महाराष्ट्रात सध्या चांगल्या माणसांची अब्रु काढण्याचे उद्योग सुरू झालेत. राजकारणाची पातळी केवळ संगमनेरची नाही तर संपूर्ण राज्य व देशाची घसरली आहे, असे ते म्हणाले.

निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी देशाच्य निवडणूक आयुक्तांवरही टीका केली. ते म्हणाले, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद पाहून मला हसू आले. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला पाहिजे. कारण, सगळेच त्यांच्या हातात आहेत. ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिले नाही. त्यांनी 45 दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याच्या मुद्यावर अत्यंत गंमतीदार उत्तर दिले. तुम्ही का डिजिटल स्वरुपातील यादी दिली नाही? कागदांचे गठ्ठे का दिले? त्यांनी अनेक गोष्टींचे उत्तर दिले. त्यांचे बोलणे एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखे होते. माझ्या मते, ते त्यांना कुणीतही लिहून दिलेले वाचून दाखवत होते.

निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पण त्या अल्टीमेटमला काहीही अर्थ नाही. आयोगाचे वागणे स्वतंत्रपणाचे दिसत नाही. आता सर्वांना टी एन शेषण यांची आठवण येत आहे. निवडणूक कसा काम करतो, त्याची स्वायत्ता कशी असते याचे आदर्श उदाहरण शेषण यांनी घालून दिले आहे, असे थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat Criticizes ECI Says EC Should Start His Own Party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात