विशेष प्रतिनिधी
मुंबई : Balasaheb Thorat राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत थोरात यांनी टीका केली आहे.Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांनी 10 टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले असा सवाल उपस्थित करत डिजिटल युगात दुबार नावे स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणे म्हणजे कुठल्यातरी रिमोट कंट्रोल खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय व्यक्त केला. थोरात म्हणाले, निवडणूक आयोग जे करत आहेत ते निवडणुकीचा पोरखेळ आहे. ब्राझील मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो, मग त्याची अंमलबजावणी किती वेळा केवळ स्टार केले जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Balasaheb Thorat
1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली. निवडणूक रणधुमाळी 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App