विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंगार अजूनही पेटता आहे… विचार अजूनही जिवंत आहेत!!, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या सुरवातीलाच सूचक सोशल मीडिया पोस्ट केली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट मधून लवचिक भूमिका जाहीर केली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अंगार अजूनही पेटता आहे… विचार अजूनही जिवंत आहेत, असे लिहून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे आहे. त्याबद्दल तडजोड नाही, असे सूचित केले. यावेळी त्यांनी फोटो फीचर सुद्धा आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले.
महाराष्ट्र @ दावोस : AI, इनोव्हेशन सिटी ते रायगड – पेण ग्रोथ कॉरिडॉर आर्थिक प्रगतीची घोडदौड!!
एकनाथ शिंदे यांनी पोस्ट मध्ये लिहिले :
मराठी मनामध्ये अस्मितेचा अंगार चेतवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिगल सिनेमागृहासमोरील त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी मनांचे मानबिंदू, मराठी जनामध्ये हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा हुंकार चेतवणारे थोर व्यंगचित्रकार, साक्षेपी संपादक, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रा.मनिषा कायंदे हेदेखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App