विशेष प्रतिनिधी
मुंबई :माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राजसाहेब ठाकरे चालवत आहेतजमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनरवरून केले आहे.Balasaheb, give Uddhavji enlightenment about Hindus, appeal from MNS banner
सेनेचं हिंदुत्व हे केव्हाच संपलं आहे बाळासाहेब गेल्यावर हिंदुत्व निघून गेलं. आता सेनेचा रंग हिरवा झाला आहे, अशी टीका मनसेच्या बॅनरमध्ये करुन शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली आहे.यापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे, अशा आशयाचा बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आला होता.
तो बॅनरही शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात लावला होता. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुडीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तब्बल 20 फुटाचा बॅनर होता. लोकांचं लक्ष वेधून घेत असलेल्या बॅनरची चर्चा त्यावेळी झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App