बाई पण भारी च्या ‘चारूला’ मास्टर ब्लास्टर चा व्हिडिओ कॉल,सचिन कडून दीपाच्या भूमिकेचे कौतुक!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बाई पण भारी देवा हा सिनेमा सध्या रसिका प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून आहे. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा सिनेमा महाराष्ट्रातील महिलावर्गांनी डोक्यावर उचलून घेतला आहे. प्रेक्षक वर्गाकडून या सिनेमाचं कौतुक होतच आहे तर दुसरीकडे हा सिनेमा 100 कोटीच्या क्लब मध्ये समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. Bai pn Bhari Deva movie news

भारी देवा सिनेमाचं विशेष स्क्रिनींग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आयोजित केलं होतं.या स्क्रिनींगला सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते अजित भुरे आणि सिनेमाचे कलाकार उपस्थित होते. पण मालिकेच्या शुटींगमुळे बाईपण.. मधली चारु म्हणजेच अभिनेत्री दीपा चौधरी उपस्थित नव्हती. दीपाला सचिनने व्हिडीओ कॉल लावला होता. खुद्द सचिनचा व्हिडीओ कॉल आल्यावर दीपाचा आनंद गगनात मावेनासा झाला.दीपाने सोशल मिडीयावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.



माझ्यासाठी ही फॅन मोमेंटदीपाने सचिनचा व्हिडीओ कॉल आल्याचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “THE DREAM COME TRUE MOMENT.. सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील… त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला.

पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण.”अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं वाटतंयदीपा चौधरी पुढे लिहीते.. “मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी.”दीपाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सचिन तेंडुलकर तिचा क्रश आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे सचिनचा व्हिडीओ कॉल आल्याने दीपा एकदम खुश झाली असेल, यात शंका नाही

Bai pn Bhari Deva movie news

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात