विशेष प्रतिनिधी
अमरावती : Bachchu Kadu प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यांच्या शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यभरात त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली जात आहे आणि ‘आम्ही मॅनेज झालो’ असे बोलणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.Bachchu Kadu
आंदोलनात सहभागी होण्याऐवजी शेतकरी आंदोलन बंद करा असे मॅसेज पाठवणाऱ्या कार्यकर्त्यांना बच्चू कडू यांनी गावोगावी आंदोलन उभे करण्याचे आवाहन केले. कडू यांनी समाधान व्यक्त केले की, त्यांच्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा जो संपला होता, तो आज पुन्हा जिवंत झाला आहे. मात्र, केवळ टीका आणि आरोप करण्याऐवजी लोकांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, अशा शब्दांत त्यांनी खडेबोल सुनावले.Bachchu Kadu
आम्ही मरायला पाहीजे असे काहींना वाटत होते
बच्चू कडू म्हणाले, आता 8वा वेतन लागू केला, का तर बिहारची निवडणूक आहे म्हणून. आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मरायला पाहीजे असे काहींना वाटत होते. अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केलेत. कोर्टाचा आदेश आला तर आम्ही जेलभरो करायला सुरुवात केली. पण आमची परिस्थिती दाखवायला मीडिया कमी पडला. तसेच पुढे बोलताना कडू म्हणाले, राज्यात मराठ्यांचे आंदोलन झाले. ओबीसी आंदोलन झाले. मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा झाला. हे भावनिक विषय आहेत. शेतकऱ्यांचा मुद्दा वेगळा आहे. बाकीच्यांची ताकद मोठी आहे, असेही ते म्हणाले.
जर वसुली केली तर बच्चू कडू ठोकणार
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, 2020-21 मध्ये कर्जमाफी झाली. दोन कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदारांची झाली. नियमित वाल्यांची नाही. काल जर कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते. सक्तीची वसुली आणि वसुली यात फरक आहे. शासन निर्णय आहे की, वसुली थांबवा. जर वसुली केली तर बच्चू कडू ठोकणार, असा इशारा कडू यांनी यावेळी बोलताना दिला.
तसेच मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट नीट ऐका. आजही एकनाथ शिंदे म्हणाले की कर्जमाफी होणार. आमच्या आंदोलनाने कर्जमाफीची तारीख मिळाली की नाही? सगळे शेतकरी नेते होते. सगळ्यांवर आरोप करायला निघाले. घरून बसल्या बसल्या आरोप करणे सोपे आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होणार याला तारीख नाही म्हणायची का? असा सवाल करत कडू यांनी विरोधकांवर टीका केली.
सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या मागे लागली
बच्चू कडू म्हणाले, आमचे सातही नेते आंडूपांडू आहेत का? 30 जून नंतर जर कर्जमाफी नाही झाली तर हंगामा होईल. जर कर्जमाफी झाली नाही तर भाजपला निवडणुकीत मत देऊ नका. सरकारने आज कर्जमाफी केली असती तर 15-20 कोटीत निपटले असते. आता 30 जून असल्याने 45 कोटीच्या वर आकडा जाईल. मग काय चुकले? 12 तारखेला अलिबाग येथे राज्यातील सगळ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना बोलावले आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या मागे लागली आहे. माझे घर हवामहल आहे म्हणतात, या पाहायला एकदा आणि पहा. आमचे काय हाल झाले हे आम्हालाच माहिती, असे बच्चू कडू म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App