Bachchu Kadu : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – मरण्यापेक्षा लढणे सुरू करा

Bachchu Kadu

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Bachchu Kadu प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली आहे. तसेच हा कार्यक्रम सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले. बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते.Bachchu Kadu

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात नुकतीच राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदत पार पडली. या परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, बच्चू कडू आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांच्या प्रमुख सहभागाने चर्चा झाली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनेची सभा ठरली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका, असे खळबळजनक विधान केले.Bachchu Kadu



नेमके काय म्हणाले बच्चू कडू?

ही वेदनाची परिषद, दुःखाची परिषद आहे. दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे. तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते., असे बच्चू कडू म्हणाले.

मला निवडणुकीत शेतकऱ्यांनीच पाडले

बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटले आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला. शरद जोशींना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि मलाही शेतकऱ्यांनीच पडले. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असेच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही. असही बच्चू कडू म्हणाले.

डुक्कर परवडले पण सरकार नाही

लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला, सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. सरकार हे डुकरासारखे आहे, डुक्कर परवडले पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असते हप्ते वसूल केले की झाले, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा

तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. आपण जर शेतकऱ्याला विचारले तर तू काय करतो, तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मारण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल, असेही बच्चू कडू म्हणाले.

नागपूर मोर्चाची घोषणा

या परिषदेत बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूर मोर्चाची घोषणा केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने काळे कायदे रद्द करायला लावले, तर आम्ही ‘बायकोची आठवण’ येऊन घरी परततो. शेतात जितकी मेहनत करता, तिच्या एका टक्क्याने आंदोलनात भाग घ्या, मग तुमचे हक्क मिळतील. जेव्हा सर्व रंगांचे झेंडे घेऊन शेतकरी लढतील, तेव्हाच सुखाचे दिवस येतील, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

Bachchu Kadu Shocking Remark Suicide Cutting MLAs Farmer Rights Convention

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात