विशेष प्रतिनिधी
मुबई : Babanrao Taywade 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. तायवाडे यांच्या मते, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, आणि त्यापैकी फक्त 27 Babanrao Taywadeअर्ज मंजूर झाले आहेत. बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे.Babanrao Taywade
ऑगस्टच्या अखेरीस 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली होती. या उपोषणात लाखो मराठा कार्यकर्ते सहभागी झाले. या उपोषणामुळे मुंबईतील वाहतूक जाम झाली होती आणि काही लोकांनी ही बाब हायकोर्टात नेली. हायकोर्टानंतर लगेचच राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेर 2 सप्टेंबर 2025 शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर मंजूर केल्यानंतर मनोज जरांगेंचे उपोषण सुटले. आता बबनराव तायवाडे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.Babanrao Taywade
नेमके काय म्हणाले बबनराव तायवाडे?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एका वृत्तवाहिनी संवाद साधताना मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी किती अर्ज आले आणि किती प्रमाणपत्रे वितरीत झाली याची आकडेवारी दिली. ते म्हणाले, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ॲाक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 27 अर्जच मंजूर झाल्याचा दावा डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. 2 तारखेच्या जीआनंतर 35 दिवसांत मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य झाले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा सरकारी पुरावाच तायवाडे यांनी सादर केला.
बबनराव तायवाडे पुढे म्हणाले, जर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करुन वक्तव्य करावे. बेजबाबदारपणे वक्तव्य करु नये. ओबीसी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांसाठी आरक्षण संपले म्हणणारे जबाबदार असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला.
2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी समाज आक्रमक
हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर सातारा गॅझेटवरही लवकरच निर्णय अपेक्षित आहे. या जीआरवर मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि इतर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ओबीसी समाजाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात तयारी केली आहे. मात्र, ओबीसी नेत्यांच्या या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बबनराव तायवाडे यांनी सादर केलेल्या आकडेवारीने मात्र खळबळ उडवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App