विशेष प्रतिनिधी
नागपूर : Babbanrao Taywade मंत्री छगन भुजबळ हे समाजाचे मोठे नेते आहेत. एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या ओबीसी नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे योग्य नाही, भुजबळ यांनी तसे करायला नको होते, असे म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.Babbanrao Taywade
बबनराव तायवाडे म्हणाले की, बीड मधील महाएल्गार सभेत वडेट्टीवार यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतचा जुना व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वडेट्टीवारांनी तेव्हा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिले पाहिजे, या मागणीचे समर्थन केले होते. वडेट्टीवार यांच ते वक्तव्यही चुकीचे होते. मात्र त्याचा अर्थ असा नाही की वारंवार ती चूक सर्वांसमोर आणायला हवी.Babbanrao Taywade
वडेट्टीवारांशिवाय विदर्भात ताकद कोणाची?
बबनराव तायवाडे म्हणाले की, वडेट्टीवार यांनी नागपुरात एवढा मोठा ओबीसी मोर्चा घेऊन दाखवला. त्यांच्याशिवाय विदर्भात एवढी ताकद कोणाची आहे, हे विसरून चालणार नाही. भुजबळ हे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी वडेट्टीवार यांना एकट्यात बोलावून ती चूक सांगायला हवी होती, अशी अपेक्षा तायवाडे यांनी व्यक्त केली.
आरक्षणाला धक्का लागणार नाही
बबनराव तायवाडे म्हणाले की, 2 सप्टेंबरच्या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मी माझ्या मतावर अजून ठाम आहे. 2 सप्टेंबरपासून आतापर्यंत केवळ 27 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, त्यांना दाखला देण्याची तरतूद जीआरमध्ये नाही. अन्यथा दाखले घेण्यासाठी 8 जिल्ह्यांत मराठा समाजाच्या रांगा लागल्या असत्या. यावरून सरकारच्या जी आरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नसल्याचेच स्पष्ट होते. आमच्या ओबीसी नेत्यांमध्ये काही मुद्यावर मतभेद आहेत. पण मनभेद नाही. भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही निश्चितच एका व्यासपीठावर येऊ.
वडेट्टीवारांनी भूमिका बदलली
छगन भुजबळांनी यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. मनोज जरांगेंच्या लोकांनी मागे बीड पेटवले. मी गेलो व सांगितले की, मी इथे तोंड उघडणार. मी तेव्हा मंत्रिमंडळाचा राजीनामाही देऊन आलो होतो. त्या बैठकीत वडेट्टीवारांसह सर्वच मंडळी होती. अतिशय जोरात ते बोलले. ते म्हणाले भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजुला राहूद्या, हा पिवळा झेंडा घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊया आणि या ओबीसीला न्याय मिळवून देऊया. आम्हाला आनंद झाला. एखाद्या पक्षाचा नेता ओबीसींसाठी उत्साहाने भांडत असेल, तर मला आनंद होणे स्वाभाविकच आहे. त्यानंतर बाकीच्या सभा झाल्या. मग त्यांनी भूमिका बदलली, म्हणून मी त्यांना बोललो, असे ते म्हणाले.
हेवेदावे संवाद करून मिटवून टाकू
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमधील मेळावा ना भूतो न भविष्यती असा झाल्याचे मत मांडले. ते म्हणाले, भुजबळ साहेब काल ओबीसींचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आपल्यामध्ये असणारे हेवेदावे संवाद करून मिटवून टाकूया आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवायला हवे, अशी भूमिका हाके यांनी मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App