विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Babasaheb Ambedkar महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यासाठी 125 कोटी रुपये ओतले गेले असताना त्याचा पुढचा टप्पा म्हणून दलितांना भडकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी थेट घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी खोटे नॅरेटिव्ह पसरवले. बाबासाहेब आंबेडकर म्हणे इस्लाम स्वीकारणार होते. पण नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, अशी मुक्ताफळं कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्याने उधळली.Babasaheb Ambedkar
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबरोबरच कर्नाटकात 3 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीतल्या प्रचारात शिगगावचे माजी काँग्रेस आमदार सय्यद अजीमपीर खद्री यांनी बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, अशी मुक्ताफळं उधळली. शिगगाव मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमदखान पठाण यांच्या प्रचारसभेत बोलताना सय्यद अजीमपीर खद्री म्हणाले, बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारणार असता तर सगळ्या दलित समाजाने त्यांचे अनुकरण केले असते. दलित समाजाच्या अनेक मोठ्या माणसांची नावं पण बदलली असती. आर. बी. थिम्मापूर रहीम खान बनले असते, डॉ. जी. परमेश्वर पीर साहेब बनले असते, एल. हनुमंतय्या हसन साहेब बनले असते. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून हे घडले नाही.
काँग्रेसने झटकले हात
पण मुस्लिम आणि दलितांचे संबंध कायमच चांगले राहिले. दलित वस्त्यांजवळ अनेक दर्जेदार उभे राहिले, याची आठवण सय्यद अजीमपीर खद्री यांनी करून दिली. पण त्यांच्या या भाषणामुळे काँग्रेस अडचणीत आली. अनेक दलित विचारवंतांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. भाजप नेत्यांनी पण इतिहासाचा दाखला देऊन खद्री यांचा दावा पुराव्यानिशी खोडून काढला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी खद्रींच्या भाषणाशी काँग्रेसचा संबंध नसल्याचे सांगून हात झटकून टाकले.*
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App