विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद उध्वस्त करून त्या जागी राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार बाबरी मशीद अयोध्येपासून दूर 20 किलोमीटर अंतरावरील धन्नीपूर गावात बांधण्यात येत आहे. पण बाबराच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या या मशिदीला निधी कमी पडू लागल्याने अखेरीस मुस्लिम उलेमांनी त्या मशिदीचे नामांतर करायचा घाट घातला आहे.Babar’s name blotted out forever; Renaming of mosques built near Ayodhya; Hazrat Mohammad Bin Abdullah Masjid!!
धन्नीपूर गावात उभी राहणारी मशिद आता मोहम्मद पैगंबर आणि त्यांचे वडील हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला यांच्या नावाने उभी राहणार आहे. याचा अर्थ भारताला गुलाम करणाऱ्या बाबराचे नाव इतिहासातून कायमचे पुसले जाणार आहे.
अयोध्यातल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2024 च्या अखेरीस रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिरात दर्शनाला सुरुवात देखील होईल.
या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धन्नीपूर गावात जी मशिद उभी राहणे अपेक्षित होते, तिचे काम मात्र पैशाअभावी आडून राहिले. अनेक मुस्लिम धनिकांनी सुरुवातीला मशिद बांधण्यासाठी पैसे देण्याचा वादा केला, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. अखेरीस मुस्लिम उलेमांची मुंबईत बैठक झाली आणि त्यामध्ये मशिदीचे नाव आणि डिझाईन दोन्ही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ही मशीद आधुनिक रूप देऊन बांधण्यात येणार होती, पण आता या मशिदीला पारंपारिक घुमटाचेच डिझाईन देण्यात येणार असून तिचे नाव देखील हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिद असे असणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील सोहवाल तालुक्यातील धन्नीपूर गावातली 5 एकर जमीन उत्तर प्रदेश सरकारने मुस्लिम समुदायाच्या स्वाधीन केली, पण त्या संदर्भातला टॅक्स भरण्यासाठी देखील समुदायाकडे पैसे नव्हते. गेल्या 5 वर्षांमध्ये बाबरी मशीद ट्रस्ट आवश्यकतेनुसार पैसे उभे करू शकले नाहीत. शेवटी 500 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून मशिदीचे नाव बदलून ती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे मशिदीच्या बांधकामासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन ट्रस्टचे प्रमुख अतहर हुसेन यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App