पवारांना नको असलेल्या पृथ्वीराज बाबांना हटविणार होते अहमद पटेल, पण राहुल गांधींना भेटून बाबांनी पवारांवर केली मात!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार मध्ये शरद पवारांना नको असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या निरोपाप्रमाणे अहमद पटेल हटवायला निघाले होते, पण ऐनवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आपले मुख्यमंत्रीपद वाचवत शरद पवारांवर मात केली, हा गौप्यस्फोट दीर्घकाळचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच एका वक्तव्यातून समोर आला!! Baba defeated Pawar by meeting Rahul Gandhi

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील अनेक गोष्टी सांगितल्या.

अजित पवार म्हणाले :

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती.

एके दिवशी शरद पवारांनी मला आणि आर. आर. पाटलांना बोलावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील या तीन नेत्यांपैकी एकाला पसंती देण्याबाबत विचारणा केली होती. यावर, काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत आपण न जाऊ नये असे सुचविले.

पण काँग्रेसकडून राज्यात सुरु असलेल्या नेतृत्वबदलाची माहिती पृथ्वीराज चव्हाणांना मिळाली असावी. त्यावेळी ते पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी गेले होते. तेथून ते रात्री मुंबईत आले आणि तिथून दिल्लीला गेले. त्या रात्री 2.30 वाजता राहुल गांधी परदेशातून येणार होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे विमानतळावर थांबून होते. विमानतळावरच पृथ्वीराज बाबांनी राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. दुसऱ्या दिवशी शरद पवार यांना अहमद पटेल यांचा फोन आला आणि नेतृत्व बदलाची प्रक्रिया थांबली!!

विखे पाटलांशी बदलाची चर्चा

त्याच दिवशी मी आशुतोष काळे यांच्या लग्नाला उपस्थित होतो. तिथे राधाकृष्ण विखे पाटील भेटले. त्यांनी नेतृत्व बदलाबाबत चर्चा केली. तेव्हा मी त्यांना तिघांपैकी कोणीही मुख्यमंत्री म्हणून चालेल, असे सांगितले. फेरबदल झाल्यानंतर कोणत्या विभागाला कोणता सचिव द्यायचा, याची विखेंनी चर्चा केली. मुख्यमंत्री बदलले तर सरकार पुन्हा बरखास्त होऊन नवीन सरकार स्थापन होणार असल्याने होणाऱ्या बदलाची त्यांनी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्रीच बदलला नाही. त्यामुळे आमची चर्चा देखील पुढे गेली नाही.

Baba defeated Pawar by meeting Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात