Udayanraje Bhosale : औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर फेकली पाहिजे; उदयनराजे भोसलेंची मागणी, नागपूर हिंसाचारावरून काँग्रेसवर आरोप

Udayanraje Bhosale

प्रतिनिधी

सातारा : Udayanraje Bhosale दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.Udayanraje Bhosale

औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झालेत. या हिंसाचारावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावर उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया देत औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर फेकून देण्याची मागणी केली. तसेच दंगलीवरून काँग्रेसवर मोठा आरोप केला.



नेमके काय म्हणाले उदयनराजे भोसले?

छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले ज्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार. लोकशाहीचा ढाचा रचण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे काम मोदीजींनी केले. ही मूठभर लोकं जी व्यक्तीकेंद्रीत असतात, वैयक्तिक स्वार्थाने पेटून उठलेल्या असतात त्यांची कुठलीही जात-पात नसते. अशा लोकांना ठेचण्याचे काम समाजाने केले पाहिजे. शिवाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करावा. शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

नागपूरच्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, याबाबत उदयनराजे यांना विचारले असता, जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस भरपूर दंगली व्हायच्या. व्यक्ती केंद्रित लोक समाजाच्या कुठल्याही पक्षाचे किंवा जातीचे नसतात तर ती विकृती असते, असे ते म्हणाले.

नीतेश राणेंचे वक्तव्य स्वाभाविक

शिवाजी महाराजांच्या फौजेत मुस्लिम व्यक्ती नव्हते असे म्हणणाऱ्या नितेश राणेंनी भावनेच्या ओघात असे वक्तव्य करणे स्वाभाविक असल्याचेही उदयनराजे भोसले म्हणाले. या सगळ्याला खऱ्या अर्थी कारणीभूत कोण आहे? समाजात द्वेष पसरवण्याचा खरा प्रयत्न कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला. त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन काम करायला हवे होते .काँग्रेसने मुस्लिम समाजाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांनी मुस्लिम समाजाला उचलून धरले, असा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला.

Aurangzeb’s tomb should be thrown out of the country; Udayanraje Bhosale’s demand,

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात