औरंगजेब टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाला फूस कोणाची?, खोलात जाऊन चौकशी करू; फडणवीसांचा इशारा

प्रतिनिधी

मुंबई : नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवला. त्या पाठोपाठ कोल्हापुरात टिपू सुलतान चे उदात्तीकरण केले. या सर्व घटनांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामागे नेमकी फुस कोणाची आहे?, याची खोलात जाऊन चौकशी करू, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Aurangzeb’s exaltation of Tipu Sultan

महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. देशात मुस्लिम समाजाविरुद्ध वातावरण तापवण्यात येत असल्याचा दावा पवारांनी केला. पवारांच्या या आरोप आणि दाव्याला त्या आरोपाला फडणवीस यांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाचे नेते कोल्हापुरात जाऊन म्हणतात, महाराष्ट्र दंगली घडवण्याचे षडयंत्र आहे. पण एकाच वेळी औरंगजेबाचे आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण केले जात आहे.

त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पण त्यांना फूस देणारी वक्तव्य कोण करते आहे? त्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट समाजातूनच प्रतिक्रिया मुद्दामून कशी उमटवली जात आहे हे सगळे आम्हाला माहिती आहे. आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

– एकनाथ शिंदेंचा पवारांना टोला

देशात मोदीविरोधी वातावरण आहे, असा दावा शरद पवारांनी काल छत्रपती संभाजी नगरच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी प्रत्युत्तर दिले. कोणतीही निवडणूक जवळ आली की शरद पवार अशी विधाने करतच असतात. त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. 2014 – 2019 या दोन्ही निवडणुकांच्या वेळेला पवारांनी अशीच विधाने केली होती. पण प्रत्यक्षात मोदींच्या नेतृत्वाखाली 300 लोक निवडून आले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला, तर शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते हा महाराष्ट्राचा अनुभव आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Aurangzeb’s exaltation of Tipu Sultan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात