विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या औरंगजेब विषयक वादावर काल गुढीपाडवा मेळाव्यात संताप व्यक्त केला. औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले, पण त्याचवेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरी पाशी नेमके काय लिहायचे??, हे देखील सांगितले, पण त्याकडे मराठी माध्यमांनी मुद्दामून दुर्लक्ष केले राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या अर्धवट बातम्या चालवल्या.
राज ठाकरे म्हणाले, जो औरंगजेब आमच्या हिंदू धर्मावर चालून आला, ज्याने आमची मंदिरे फोडली, ज्याने आमच्या आया बहिणींची अब्रू घेतली, त्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथं गाडला असा बोर्ड त्याच्या कबरीपाशी लिहा!! महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमधल्या मुला मुलींच्या सहली तिथे नेऊन त्यांना मराठ्यांचा पराक्रम सांगा. औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी त्यांना दाखवा. आमच्या धर्मावर, आमच्या समाजावर चालून आले की काय होते??, हा इतिहास सगळ्यांना समजू द्या!!, असे संतप्त उद्गार राज ठाकरे यांनी काढले.
पण प्रत्यक्षात औरंगजेबाच्या कबरी पाशी नेमके काय लिहिले आहे??, ते वाचल्यावर मात्र औरंगजेबाची कबर उखडूनच का फेकली पाहिजे??, याचे कारण समोर येते. औरंगजेबाच्या कबरी पाशी त्याच्या समर्थकांनी “मकबरा मुगल सम्राट औरंगजेब आलमगीर” असे लिहिले आहे. त्याचबरोबर आत मधल्या एन्ट्री पॉईंट वर “मजार मुगल सम्राट शहंशाह हजरत औरंगजेब आलमगीर” असे लिहिले आहे. या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला, तर औरंगजेबाच्या समर्थकांनी त्याला कसे गौरविले आहे, हेच दिसून येते.
औरंगजेबाच्या कबरीला त्याच्या समर्थकांनी “मकबरा” आणि “मजार” असे दोन्ही अर्थाने संबोधले आहे. मकबरा आणि मजार या शब्दांचा अर्थ महापुरुषाची किंवा संताची समाधी, मजार म्हणजे महापुरुषाची समाधी, तर मकबरा म्हणजे राजपुरुषाची समाधी. त्याचबरोबर औरंगजेबाला त्याच्या समर्थकांनी “आलमगीर” म्हणजे विश्व विजेता या गौरवपूर्ण शब्दांनी तिथे संबोधले आहे. याचा अर्थ औरंगजेब समर्थकांना तो महापुरुष, राजपुरुष आणि विश्वविजेता सम्राट वाटतो. म्हणूनच त्याची समाधी म्हणजेच मकबरा आणि मजार तिथे बांधली आहे, असे बोर्ड औरंगजेबाच्या कबरी पाशी लावले आहेत.
राज ठाकरे यांनी मात्र औरंगजेबाच्या कबरी पाशी पराक्रमी मराठ्यांनी औरंगजेबाला इथं गाडला, असा बोर्ड लिहायला सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App