प्रतिनिधी
नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. या मुद्द्यावरून भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना टोचत असताना दुसरीकडे माजी खासदार संभाजी राजे हे देखील संतप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने त्रास दिला आणि ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केली त्याचे कौतुक आपण कसे कसे काय करू शकतो??, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले आहे. Aurangzeb praises Prakash Ambedkar; Sambhaji Raja got angry
नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी या संदर्भात आपला संताप व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देखील महत्त्वपूर्ण संदर्भातील डॉ. आंबेडकर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला गेले होते, याची तरी आठवण ठेवायची. प्रकाश आंबेडकरांना जायचेच होते, तर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला जायचे होते, असे उद्गार संभाजी राजे यांनी काढले.
प्रकाश आंबेडकरांनी गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगर मध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले आणि त्याला फुले वाहिली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी त्यांची युती असली तरी त्यात वादाची ठिणगी पडली. प्रकाश आंबेडकरांनी नंतर आपल्या राजकीय कृतीचे समर्थन केले. औरंगजेबावर बोलण्याआधी ज्या जयचंदामुळे त्याचे राज्य आले, त्याच्यावर बोला, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले. या मुद्द्यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले.
पण आता माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आंबेडकरांवर त्याच मुद्द्यावर टीका केली. वास्तविक काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती. पण आता प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेब मुद्दा उकरून काढल्याने त्यांच्यात आणि संभाजी राजे यांच्या नवा व राजकीय वाद तयार झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App