‘’औरंगजेब या देशातील मुस्लिमांचा सुद्धा नेता होऊ शकत नाही’’ विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांचं विधान!


‘’भारतात हिरो केवळ छत्रपती शिवाजी महाराज हेच होऊ शकतात.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ”माझी उपमुख्यमंत्र्यांना एवढेच म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या मुलांमागचा मास्टरमाईंड कोण? हे शोधण्यासाठी यासंदर्भात आपण एसआयटी स्थापन करणार का?” असा प्रश्न आज भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. Aurangzeb cannot be the leader of the Muslims of this country Devendra Fadnavis statement in the legislature

फडणवीस  म्हणाले, ‘’महाराष्ट्रात कुठल्याही स्थितीत औरंगजेबाचे महिमामंडन आम्ही सहन करणार नाही! औरंगजेब या देशातील मुस्लिमांचा सुद्धा नेता होऊ शकत नाही. भारतात हिरो केवळ छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात.  ’’

याशिवाय, ‘’काही ठिकाणी सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो आहे. ATS आणि IB त्यावर काम करते आहे. काही माहिती आम्हाला मिळाली आहे, मात्र ती सभागृहात सांगता येणार नाही. काही प्रकरणात विलंबाने कारवाई करण्याचे प्रकार झाले. त्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.’’

याचबरोबर ‘’ राजकारणात मतांचा विचार केला जात असला तरी काही बाबी या राष्ट्रहिताच्या असतात, हे कायम लक्षात ठेवावे. मतांच्या लांगूलचालनासाठी असे प्रयत्न होता कामा नये.’’ असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Aurangzeb cannot be the leader of the Muslims of this country Devendra Fadnavis statement in the legislature

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात