महाविकास आघाडी सरकारकडून पोलिसांच्या मदतीने मुस्कटदाबी; संजय केनेकरAURANGABAD: Maha Aarti at Supari Hanuman Temple on the occasion of Hindu Valor Day; BJP’s Sanjay Kenekar arrested earlier; Public protest of Thackeray-Pawar government from BJP
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद :आज ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि शौर्य दिवस या निमित्ताने भाजप शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर हे भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आणि सुपारी हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना भाजप कार्यालय येथून ताब्यात घेत पोलीस ठाणे वेदांतनगर येथे स्थानबद्ध केले.
भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष संजय केनेकर हे सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जात होते व त्या नंतर ते संभाजीनगर चे आराध्य दैवत सुपारी हनुमान या ठिकाणी सकाळी अकरा वाजता हिंदूंच्या शौर्य दिनानिमित्त महाआरती करणार होते परंतु यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यालय मध्ये प्रचंड मोठा पोलीस फौज फाटा जमा झाला.
त्यांनी शहराध्यक्ष केनेकर यांना अटक केली .त्यांना वेदांत नगर पोलिस स्टेशन याठिकाणी स्थानबद्ध केले .दरवर्षी भारतीय जनता पार्टी 6 डिसेंबर या दिवशी भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करते.
त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात येते.हिंदूंना घाबरणाऱ्या भीती दाखवणाऱ्या महा विकास आघाडी ठाकरे सरकारचा चा जाहीर निषेध यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला व जोरदार घोषणाबाजी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App