प्रतिनिधी
नवी दिल्ली : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र या निर्णयाला अधिकृत कायदेशीर पाया नव्हता म्हणून त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय घेतला आणि तो केंद्रात मंजुरीला पाठवला. केंद्राने शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी याला मंजुरी दिली. Aurangabad became Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv of Osmanabad
केंद्राच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. औरंगाबादच्या नामांतराबरोबरच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 24, 2023
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 24, 2023
केंद्राच्या मंजुरीने आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण अधिकृतपणे झाले आहे. औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकार कोसळण्याच्या आधी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा निर्णय घेऊन आपण दोन्ही काँग्रेससोबत असलो तरी हिंदुत्व सोडले नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार आले. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर होता म्हणून तो रद्द करून पुन्हा नामांतराचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि तो मंजुरीसाठी केंद्राला पाठवला, केंद्राने त्याला मंजुरी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App