परीक्षेला निघालेल्या मुलीवर मुंबई लोकल ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न; आरोपी नवाज करीमला अटक

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत नवाज करीम या ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पण मुलीने अतिशय चपळाई आणि सतर्कता दाखवली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. Attempted rape of a girl on her way to an exam in a Mumbai local train; Accused Nawaz Karim arrested

मस्जिद आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकांदरम्यान सकाळी ७.२६ वाजता ही भीषण घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, नवाज करीम तिच्या कंपार्टमेंट मध्ये शिरुन तिच्याशी लगट करू लागला. तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपी नवाज करीमने पळ काढला पण रेल्वे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी आठ तासांच्या आत त्याला अटक केली.

मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. ती परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. सदर घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज स्कॅन करून त्या व्यक्तीची ओळख पटवून नवाज करीम ला अटक केली.

नवाज करीम हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Attempted rape of a girl on her way to an exam in a Mumbai local train; Accused Nawaz Karim arrested

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात