विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हल्ले वाढलेत, संजय राऊत यांचा जावईशोध
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हल्ले वाढलेत असा जावईशोध शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला आहे. मराठी-अमराठी वादावर बोलताना ते म्हणाले Sanjay Raut -देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी मराठी माणसाची फळी फोडली.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि आजूबाजूचा परिसर अदानी, लोढा आणि इतर अमराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी मोदी, शहा, फडणवीस मराठी माणसाला कमजोर करत आहेत. कालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हे हल्ले वाढत चालले आहेत. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे हे कट सुरू आहेत.
राऊत म्हणाले, ज्यांच्या हातामध्ये हे शिवसेनेचे चिन्ह मोदी, शहा यांनी दिले ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत. त्यांना कल्याण मधील घटनेची वेदना कळते आहे का ? एकनाथ शिंदे नामर्द आहेत. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेबांची संघटना फोडायला मदत केली. त्यांनी मराठी माणसाचं जिण नकोसं केलं. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोललं जात आहे. हल्ले सुरू आहेत हे राष्ट्रीय कारस्थान आहे. मराठी माणसाला कायमचा तडीपार करायचे आहे. या सर्वांना लाज वाटली पाहिजेकालच्या मराठी माणसांवरील हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, ते भारतीय जनता पक्षाची भूमिका पुढे नेत आहेत. मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे. मराठी म्हणून घेण्याची.या सर्वांना लाज वाटली पाहिजे राज ठाकरे हे देखील भाजप सोबत आहे.
सत्तेचा गैरवापर आहे. सत्तेची मस्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा अपशब्द काढतात. त्याविरुद्ध आवाज उठविला तर, राजकीय पक्षाच्या संघटनेवरती हल्ले केले जातात. ही सत्तेची मस्ती आहे. इतिहासात अनेक दाखले आहेत. हुकूमशाही मस्तवाल लोक नष्ट झालेली आहेत, असे सांगून राऊत म्हणाले, आम्ही संविधान वाचविण्यासाठी काम करतोय. आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे शंभर बाप खाली उतरावे लागतील. दिलेली असताना आमची सर्व सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. आम्ही काय सुरक्षेसाठी भिक मागत बसलो नाही. हिंमत असेल तर अंगावर या. त्यांनी मराठी माणसावर हल्ले सुरू केले आहेत हा त्यांचा अंत आहे. ही त्यांच्या अंताची सुरुवात आहे
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री काय बोलतात याकडे फार लक्ष देऊ नका. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये नक्षलवाद संपलेला आहे असे अमित शहा म्हणतात. अमोल पालेकर, बाबा आढाव नक्षलवादी होते का ?अनेक आर्मी ऑफिसर नक्षलवादी होते का ? तुम्ही अतिरेकी नक्षलवादी कोणाला म्हणत आहात, तुमच्या अवतीभवती जे भ्रष्टाचारी आहात त्यांचा बंदोबस्त करा.
संसदेत झालेल्या गोंधलावर बोलताना राऊत म्हणाले, मी काल राहुल गांधी यांच्यासोबत होतो. आम्ही त्यानंतर पार्लमेंटला गेलो. राहुल गांधी हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. सारंगी यांचा बॅकग्राऊंड पहिला पाहून घ्या. त्यांना ड्रामा थिएटरचा पुरस्कार मिळाला पाहिजे भाजप ही नाट्य शाळा आहे. मराठीत म्हणत आहे ही नटरंगी नार.
सरसंघचालक मोहन भागवतांच्या कान टोचण्याला काही अर्थ नाही. याच लोकांनी भाजपाला सत्तेवरती आणल आहे. देशाच नुकसान करण्याच काम आरएसएसने केले आहे. म्हणून मराठी माणसावर मुंबईमध्ये हल्ले होत आहेत. त्यामुळे भागवत यांच्याकडून कान टोचण्याकडे लक्ष देऊ नका ज्यांच्यावर आरोप केले, लोकसभेच्या काळात ज्यांच्यामुळे पराभव झाला त्या अजित पवार यांनाच तुम्ही बौद्धिक घ्यायला बोलावता असा टोलाही त्यांनी मारला.
संतोष देशमुख प्रकरण अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस मागणी करत आहेत. मुख्य आरोपीला अटक करा. परंतु का अटक केली जात नाही? आरोपीला पाठीशी घालणारे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस,यांच्यासोबत मंत्री मंडळात मांडीला मांडी लावून आहेत . हे महाराष्ट्राला शहाणपणा देणार राज्य करत आहेत. हे अपशकुनी सरकार आहे. या हत्या झालेल्या आहेत जिल्ह्या जिल्ह्यात हल्ले, हत्या, दरोडे यांना उत आलेला आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसावर हल्ले करण्याचे कारस्थान रचली जातात. कल्याण मधून ही सुरुवात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App