विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने अर्थात ATS ने धडक कारवाई केली असून टेरर फंडिंग करणाऱ्या हुफेज अब्दुल अजीज शेख या उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला त्यांनी फंडिंग केल्याचे आढळून आले. हुजेफ अब्दुल अजीज शेखला ATS ने अटक केल्यानंतर ताबडतोब कोर्टात हजर केले कोर्टाने आरोपीला 31 जानेवारी पर्यंत ATS कोठडी सुनावली आहे. ATS strike action in Nashik
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून हुफेजला ATS पथकाने अटक केली. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करून हुफेज शेख हा दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. तो उच्चशिक्षित असून अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदारही होता, अशी माहिती ATS च्या सूत्रांनी दिली. हुफेज शेखने अटकेनंतर दिलेल्या माहितीच्या आधारे ATS ने त्याच्या अन्य साथीदारांच्या शोधासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये आपली पथके रवाना केली आहेत.
हुफेजच्या घर झडतीत ATS ने 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केले. हुफेज शेख हा सीरिया मधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत होता.
ठाणे जिल्ह्यात 41 ठिकाणी छापे
मागील महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आयसिस या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या आरोपांवरून ठाणे जिल्ह्यासह देशभरात कारवाई केली होती. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे घातले होते. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतले होते. आरोपींकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली, शहापूर, मिरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App