ATS Raids : टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यात एटीएसचे छापे; 18 जण ताब्यात, 2 वर्षांपूर्वी अटक झालेल्या अतिरेक्याकडून सुगावा

ATS Raids

विशेष प्रतिनिधी

पुणे : ATS Raids साताऱ्यातील टेरर फंडिंगप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर एटीएसने पुण्यात १९ ठिकाणे छापे टाकले. त्यात १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यात २०२३ मध्ये इसिसचे मॉड्यूल उघडकीस आले. पुणे, मुंबई, गुजरातमधील काही शहरात ड्रोन हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या काही दहशतवाद्यांना अटकही झाली होती.ATS Raids

त्यांची जबानी आणि तांत्रिक विश्लेषणातून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यावर करडी नजर ठेवली. त्यात साताऱ्यातून पुण्यात बॉम्ब तयार करण्यासाठी टेरर फंडिंग झाले आहे. तसेच इसिस मॉड्यूल पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय आला. त्यावरून बुधवारी मध्यरात्री १२ वाजता एटीएसचे पथक कोंढवा परिसरात धडकले. संशयितांचे घर व कार्यालय परिसरात छापेमारी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संशयितांवर दोन वर्षांपासून नजर ठेवली जात होती. सूत्रांनी सांगितले की, कोंढवा, वानवडी, खडकी, भोसरी भागात छापे टाकण्यात आले. संशयितांच्या मोबाइल, लॅपटॉपचे फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषण होणार आहे.ATS Raids



१८ संशयितांमध्ये ठेकेदार, बँकरसह काही आयटी अभियंत्यांचाही समावेश

पुण्यात दोन वर्षांपूर्वी अटक केलेले दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी कोंढवा परिसरातील एका इमारतीत फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला. बॉम्बच्या तीव्रतेची चाचणी कराड परिसरातील एका जंगलात जाऊन केली होती. मात्र, या वेळी त्यांनी सदर बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची जुळवाजुळव करण्यासाठी सातारा येथील एका गणपती सिल्क साडी सेंटर येथे ८ एप्रिल २०२३ रोजी रात्री पिस्तुलाचा धाक दाखवत एक लाखांची रोकड लुटली होती. ही बाब तपास यंत्रणाच्या चौकशीत उघडकीस आल्यानंतर चार जणांना अटक झाली. या गुन्ह्याचा सखोल तपास करताना दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) पुण्यातील कोंढवा, वानवडी, खडकी, भोसरी परिसरात धागेदोरे मिळून आले आहे. दहशतवाद्यांचे आर्थिक मॉड्यूल उघडकीस आणण्याचे प्रयत्न एटीएसने १९ ठिकाणी केलेल्या छापेमारीतून आगामी काळात केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. साताऱ्यात एक लाखाच्या लुटी प्रकरणात आधी फक्त लूटमारीचा गुन्हा दाखल होता. तपासात त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले. म्हणून सातारा पोलिसांकडून प्रकरण एटीएसकडे वर्ग झाले. मोहम्मद युनुस मोहम्मद याकीन साकी, मोहम्मद शाहनाज आलम, झुलफीकार अली बडोदावाला आणि तलाह लियाकत खान यांना अटक झाली. तलाह लियाकत खान यात मुख्य सुत्रधार होता. त्याने आरोपींना पिस्तुल पुरवत पैसा मिळवण्यास मदत केल्याचे पुरावे मिळाले. तलाह खान घटनेनंतर जाकार्ता, इंडोनेशियात लपला होता. मे २०२५ मध्ये मुंबई विमानतळावर आल्यावर त्याला एनआयएने ताब्यात घेतले होते.

धार्मिक स्थळांना सगळे एकत्रितपणे जात होते

सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी ताब्यात घेण्यात आलेल्या १८ जणांत ठेकेदार, बँकर, आयटी अभियंतेही आहेत. हे सर्वजण एकत्रितपणे धार्मिक स्थळांवर जात होते. सोशल मीडियावर ते खूप सक्रिय होते. त्यांच्या घराच्या झडतीत आक्षेपार्ह पुस्तके, कागदपत्रे, सीडी आढळल्या. काही जणांनी त्यांच्या मोबाइल, लॅपटॉपमधून डाटा डिलिट केला होता. तो लवकरच रिकव्हर केला जाणार आहे.

पुणे पोलिसांनी २०२३ मध्ये नाकेबंदीदरम्यान तीन संशयितांना कोथरूड भागात हेरले होते. मात्र, त्या वेळी माोहंमद शाहनवाझ आलम (३१,रा. झारखंड) हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या गाडीतून पळून गेला होता. नंतर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. त्या वेळी मोहंमद युसूफ खान (२५) व मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (२७, दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक करून पोलिसांनी घरझडती घेतली असता ते दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले.

अल सुफा संघटनेशी संबंध…

दोन वर्षांपूर्वी पुण्यात अटक केलेले तरुण ‘अल सुफा’ या इसिसशी जोडलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानमध्ये मार्च २०२२ मध्ये एका कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरणात ते आरोपी होते.

ATS Raids 19 Spots in Pune on Terror Funding Suspicion, 18 Detained; Links to ISIS Module and Satara Bomb Plot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात