पाटणमधील आंबेघर येथे भुसखलन : १४ जण बेपत्ता? पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना

विशेष प्रतिनिधी

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरूवारी मध्यरात्री दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन कुटुंबातील १४ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.At Ambeghar in Patan Landslide: 14 missing?

काही ग्रामस्थ घटनास्थळी पोचले आहेत. मदतकार्यास सुरवात झाली आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळले आहेत.

  • मुसळधार पावसाचा परिणाम
  •  पाण्याचे अनेक गावांत लोट
  •  आंबेघर येथे भुसखलन : १४ जण बेपत्ता?
  •  ढोकावळे येथेही घरांची पडझड
  •  मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले
  •  अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळले
  • जिल्हा प्रशासन, एनडीआरएफची टीम दाखल

At Ambeghar in Patan Landslide: 14 missing?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात