‘’कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी विधानसभा अध्यक्ष…’’ असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ठाकरे गटाचे नेते आज १६ आमदारांबाबत सचिवांना भेटायला गेले आहेत. त्यांची मागणी आहे की, न्यायालयाने अगोदरच्या आदेशात जे सांगितलं आहे त्याची सुद्धा प्रत जोडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे. कारण, फडणवीस यांनी यासंदर्भात या अगोदर असं म्हटलं होतं की, विधानसभा अध्यक्षांवर दबाव नको, निष्पक्षपणे त्यांना निर्णय घेऊ द्यावा. Assembly Speaker never takes decisions under such pressure Devendra Fadnavis
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’हे जे काही सुरू आहे, हे कुठल्या लोकशाहीत बसणारं आहे? की विधानसभा अध्यक्षांना घेराव करू. आम्ही सभागृह चालू देणार नाही, आम्ही त्यांना फिरू देणार नाही. अशा दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात.’’
याचबरोबर ‘’तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा. कुठेतरी तुम्हाला हे माहीत आहे की या ठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे. म्हणून अशाप्रकारची भाषा वापरणे सुरू आहे. पण विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत, ते एक निष्णांत वकील आहेत. कायदा समजणारे आहेत, वर्षानुवर्षे प्रॅक्टीस केलेले आहेत. ते कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाहीत.’’ असं फडणवीसांनी सांगितलं.
🕛 12 noon📍 Pune | दु. १२ वा 📍 पुणेMedia interaction#pimprichinchwad #Chinchwad #Pune https://t.co/aVQ8eKHFYY — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 15, 2023
🕛 12 noon📍 Pune | दु. १२ वा 📍 पुणेMedia interaction#pimprichinchwad #Chinchwad #Pune https://t.co/aVQ8eKHFYY
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 15, 2023
याशिवाय ,‘’सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे रिझनेबल टाईम म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ देखील अध्यक्षांना समजतो. त्यामुळे ते योग्यप्रकारचा निर्णय़ घेतील. पण मला विश्वास आहे, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरी अध्यक्ष दबावाला मात्र बळी पडणार नाहीत.’’ असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App