केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांचे पंख छाटले जात आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल आहे.Ashok Chavan said, Nitin Gadkari is in the wrong party, his wings are being cut off
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांचे पंख छाटले जात आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल आहे. केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली.
या सरकारमधील तुमचे आवडते मंत्री कोण असे विचारल्यावर चव्हाण यांनी नितीन गडकरी असे सांगितले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत एवढेच म्हणावेसे वाटतते की राईट पर्सन इन रॉँग पार्टी. गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांचे पंख छाटले जात आहेत.
चव्हाण म्हणाले, मोदी सरकारच्या सात वर्षांचे मूल्यमापन करताना एखादी चांगली गोष्ट सांगावी असे काहीच नाही. वैयक्तिक म्हणाल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक आम्ही नेहमीच करत आलो आहोत.
पण ते एनडीएच्या सरकारचा भाग असल्याने त्यांच्या कामाचे मूल्यमापन देखील सरकार म्हणूनच केले जाईल. केंद्रातील मोदी सरकारची कार्यपध्दती पाहिली तर एकमेव गडकरी हेच असे मंत्री आहेत, जे देशातील इतर राज्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून आहेत.
केवळ भाजपच नाही तर विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधी नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध अ ाहेत. त्यांची काम करण्याची पध्दत ही निराळी आणि राज्याला पुढे नेणारी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या विरोधी पक्षाचे सरकार असले तरी राज्याच्या हिताचे अनेक निर्णय मग ते खात्याशी संबंधित नसतील तरी त्यांनी नेहमीच घेतले आहेत.
महाराष्ट्राचे म्हणून त्यांचे राज्यातील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग व इतर विकासकामांवर लक्ष असतेच. त्यासाठी पक्षभेद न बाळगता ते झोकून काम करतात याचे मला विशेष कौतुक वाटते. आम्ही देखील याबद्दल त्यांचे जाहीर कौतुक करत आलो आहोत.
गडकरी यांच्यासारखी चांगली व्यक्ती एका चुकीच्या पक्षात असल्याची खंत वाटते. भाजपमध्ये त्यांना काम करू दिले जात नाही. त्यांचे अधिकार कमी केले जात आहेत. त्यांचे पंख छाटण्याचे काम देखील पध्दतशीरपणे सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App