विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रस्त्यावर काँग्रेस संघटना वाऱ्यावर आणि काँग्रेस सोडून अशोक चव्हाण कमळाच्या मार्गावर!! असे आजचे 12 फेब्रुवारी 2024 चे चित्र आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दुपारी 3.00 वाजता ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी मुंबईच्या भाजप कार्यालयासमोर मोठा पक्षप्रवेशाचे बोर्ड लागले होते. त्यामुळे माध्यमांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या दिल्या होत्या. प्रत्यक्षात काँग्रेसच्या मुंबईतल्या दोन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात अशोक चव्हाण राहुल नार्वेकरांना भेटून आले आणि त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्याची नेमकी प्रक्रिया समजून घेतली पण त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Former Maharashtra CM and Congress leader Ashok Chavan resigns from Congress. pic.twitter.com/bVUbMvx4IA — ANI (@ANI) February 12, 2024
Former Maharashtra CM and Congress leader Ashok Chavan resigns from Congress. pic.twitter.com/bVUbMvx4IA
— ANI (@ANI) February 12, 2024
मुंबईच्या दोन माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सह महाविकास आघाडीतल्या पक्षांचे बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट सांगितले. आगे आगे देखो होता है क्या!!, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेसमधल्या अनेक जननेत्यांना देशाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवाहात म्हणजेच भाजपमध्ये यायचे आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत येऊ इच्छितात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस मधून फुटणार ते भाजपमध्ये दाखल होणार अशा बातम्या बऱ्याच दिवसांपासून माध्यमांमध्ये येत होत्या. पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची 40 वर्षांची साथ सोडली. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत रस्त्यावर फिरतात पण त्यांनी काँग्रेस संघटना मात्र वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे पक्षातले नेते इतरत्र राजकीय आश्रय शोधत आहेत. असाच आश्रय अशोक चव्हाण यांनी शोधून ते भाजपच्या मार्गावर जात असल्याचे सांगितले जात आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे बळ कमालीचे घटले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी मोठमोठ्या यात्रा काढत असले, तरी पक्ष संघटनेवर त्यांना नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे पक्षातले बडे नेते निघून चाललेत, असा संदेश अशोक चव्हाण यांच्या पक्षाच्या राजीनाम्याने देशभर गेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more