विशेष प्रतिनिधी
मुंबई :Ashish Shelar महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Ashish Shelar
शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीबाबत बोलताना आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण सन्मान दिला जात असून ते आमचेही नेते आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि आरपीआय यांची बैठक झाली असून आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. जागावाटपाबाबत बोलताना, आवश्यकतेनुसार योग्य वेळी जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.Ashish Shelar
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना विचारले की, ठाकरेजी, तुमचा महापौर नेमका कोणत्या मोहल्ल्यातून येणार आहे? त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांवरही बोट ठेवले. उद्धव ठाकरेंना मानणारा आणि आदित्य ठाकरेंना मानणारा गट आता वेगळा झाला आहे, या वास्तवावर उद्धव जी किती काळ पांघरुण घालणार? असा सवाल करत त्यांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अधिकृत प्रसिद्धीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App