प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसला ओबीसीद्रोही पक्ष म्हणत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर नव्हे, तर तलवार खुपसल्याचा आरोप केला.Ashish Deshmukh joins BJP calling Congress anti-OBC party; Allegation that Thackeray stabbed Fadnavis with a sword, not a dagger
काँग्रेसने निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस ओबीसी पक्ष आहे आणि मी माझ्या झालेल्या चुका विसरून घरवापसी करीतत आहे, असे प्रतिपादन यावेळी आशिष देशमुख यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी तलवार खुपसली
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. आशिष देशमुख म्हणाले, 2019च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर नव्हे, तर तलवार खुपसली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. फेसबुकशिवाय उद्धव ठाकरे कधीही विदर्भात दिसले नाही. यासंदर्भात मी तेव्हाही आवाज उठवला होता. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्व काम ठप्प झाले होते.
आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेस व गांधी परिवार ओबीसीद्रोही आहे. कारण माझी मागणी होती की, कर्नाकट निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी ओबीसींबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल माफी मागावी. मात्र राहुल गांधींनी माफी मागितली नाही. याच राहुल गांधींनी राफेल घोटाळ्यासंदर्भात जे काही बेताल वक्तव्य केले होते, त्याबद्दल त्यांना कोर्टाने खडसावले होते. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागितली होती. त्यांतर चौकीदार चोर है, या वक्तव्याबद्दलही राहुल गांधींनी माफी मागितली होती. मात्र, ओबीसींबद्दल अवमानजनक वक्तव्य करूनही राहुल गांधींनी माफी मागितली नाही. मी तशी मागणी करताच माझे निलंबन करण्यात आले.
लोकसभा, विधानसभा लढवणार नाही
आशिष देशमुख म्हणाले, मी आमदाराकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मी येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकही लढणार नाही. या निवडणुकांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करेल. विदर्भातील नानागिरी संपवल्याशिवाय मी राहणार नाही, असा टोला आशिष देशमुख यांनी लगावला. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस विधानसभा, लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन.
काँग्रेस आता म्हतारा पक्ष
आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेस आता म्हतारा पक्ष झाला आहे. येत्या निवडणुकांत काँग्रेस काहीही कामगिरी करू शकत नाही. पूर्वी माझा काँग्रेसकडे कल असला तरी यापुढे मी भाजपसोबतच राहणार, अशी ग्वाही देतो. मला विदर्भाच्या गल्ली-गल्लीत फिरवा, माझी काहीच हरकत नाही. मी विदर्भात भाजपचे २०-२५ आमदार तरी निवडून आणू शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App