कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या क्षणी व्हिडिओ कॉन्फरन्स प्रचारसभेत द्वारे जो हिंदुत्वाचा हुंकार भरला, त्या हुंकाराने कोल्हापूरची जनताच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे जनताच संपूर्ण भारून गेलेली दिसली…!! क्या हिंदुत्वाचा भारातूनच आजचे मतदान पार पडत असल्याचे दिसत आहे…!!As true as Pawar national leadership is so true is Uddhav Thackeray Shiv Sena Hindutva
आता दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या बळावर मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला आहे, म्हटल्यानंतर त्याला नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रश्न फक्त एवढाच आहे की गेल्या अडीच वर्षात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांना वारंवार शिवसेना हिंदुत्ववादी असल्याचा उल्लेख वारंवार का करावा लागतो…??, हा मुद्दा आहे…!! आणि इथेच शरद पवार यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वात” आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या “हिंदुत्वात” विलक्षण साम्य आहे…!!
शिवाय बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमका हाच फरक आहे आहे बाळासाहेबांनी 1986 मध्ये जेव्हा जाहीरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी सतत हिंदुत्वाची गर्जना महाराष्ट्रात घुमवली. पण वारंवार आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे त्यांना सांगावे लागले नाही किंबहुना भगवी वस्त्रे रुद्राक्ष माळा या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या परिचायक ठरल्या… मग आता असे नेमके काय घडले आहे की उद्धव ठाकरे यांना शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे वारंवार सांगायला लागते…?? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बौद्धिक बळावर आणि आमदारांच्या अल्प बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकावले आहे यात उघडपणे दडले आहे.
आता ढवळ्याशेजारी बांधला पावळया या नात्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेचा वारा शिवसेनेला लागल्याने जनतेच्या मनात शिवसेनेच्या हिंदुत्वा विषयी शंका निर्माण झाली आहे आणि ही शंका दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना वारंवार शिवसेना हिंदुत्ववादी आहे, असे जाहीर करावे लागते आहे.
पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या “हिंदुत्वाचे” एक वैशिष्ट्य देखील आहे आणि ते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाशी” जुळणारे आहे. शरद पवारांचे जसे “राष्ट्रीय नेतृत्व” वारंवार सांगावे लागते तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे “हिंदुत्व”ही वारंवार सांगावे लागत आहे, हेच ते दोन नेत्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या खुजेपणातले मधले विलक्षण साम्य आहे.
शरद पवारांचे माणूस संजय राऊत हे वारंवार शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत असे सांगत असतात किंबहुना संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात ही शरद पवारांचे “राष्ट्रीय नेतृत्व” पत्रकारांच्या मनावर ठसवण्यातूनच झालेली दिसते…!!
अशा वेळी प्रश्न पडतो शरद पवारांचे नेतृत्व जर खरेच “राष्ट्रीय” आहे… तर ते संजय राऊत यांना वारंवार का सांगावे लागते…?? शरद पवारांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाच्या” बाता त्यांना नेहमी का माराव्या लागतात…?? याचा अर्थ शरद पवारांचे नेतृत्व “राष्ट्रीय” असले, तरी त्यांचे “कर्तृत्व” “राष्ट्रीय” नाही, याविषयी राऊतांना शंका आहे का…??… आणि अशी शंका येत असेल तर ती रास्तच म्हणली पाहिजे…!! कारण शरद पवारांचे नेतृत्व ज्येष्ठ आहे. वयाने ते मोठे आहेत. कारकीर्द 55 वर्षांची, ती देखील संसदीय आहे… या सगळ्या बाबी सत्य आहेत… पण मुद्दा त्यापलीकडे जाणारा “राष्ट्रीय कर्तृत्वाचा” आहे…!! शरद पवार यांचे कर्तृत्व खरंच “राष्ट्रीय” आहे का…?? या प्रश्नाचे उत्तर जर संख्यात्मक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले तर “नाही” या शब्दातच द्यावे लागते…!!
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर “पोलिटिकल रेलेव्हंट” नाही. संख्यात्मक पातळीवर नाहीच. पण वैचारिक पातळीवरही नाही. कारण काँग्रेसशी वैयक्तिक राजकीय वैर सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही वैचारिक आधार नाही. शरद पवारांना काँग्रेसचे नेते आणि प्रादेशिक पक्षांचे जो मान देतात, तो त्यांच्या वैयक्तिक ज्येष्ठत्वाचा आहे. त्यापलिकडे फारसा राजकीय मान देत नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय निर्णायक राजकारणात तर पवारांना अजिबात स्थान नाही. पण पवारांच्या जेष्ठत्वाचा वैयक्तिक मान हाच संजय राऊत यांच्या दृष्टीने पवारांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाच्या” राजकीय भांडवलाचा भाग आहे…!!
म्हणजे शरद पवारांचे हे “राष्ट्रीय नेतृत्व” संजय राऊत यांचे जसे राजकीय भांडवल आहे, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे “हिंदुत्व” हे त्यांच्यासाठी राजकीय भांडवलच आहे…!!
अर्थात शरद पवारांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाच्या” राजकीय भांडवलाचा खऱ्या राष्ट्रीय राजकारणात किती उपयोग होतो हे पाहिले तर पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा फोलपणा सिद्ध होतो. तसाच फोलपणा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या “हिंदुत्वाचा” आहे, हेही ठळकपणे दिसून येते.
ज्या गोष्टीचा एखाद्याला वारंवार उल्लेख करावा लागतो, त्या व्यक्तीच्याच मनात त्याविषयी शंका असते हा सर्वसामान्य नियम आहे. ज्याअर्थी संजय राऊत यांना शरद पवारांचे नेतृत्व “राष्ट्रीय” आहे, हे वारंवार सांगावे लागते तसेच शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही हे उद्धव ठाकरे यांना वारंवार सांगावे लागते… यातच पवार – ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वाचे प्रादेशिक आणि वैचारिक खुजेपण स्पष्ट असल्याचे दिसते…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App