विशेष प्रतिनिधी
पुणे : फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा उठवल्यानंतर मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भाषा झाली “सरळ” आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती पत्करली. पुण्यातल्या कृषी खात्यातल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या नाड्या कशा आवळल्या याचे वर्णन त्यांनी केले.
नाशिक मधल्या फसवणूक प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांची भाषा अतिशय आक्रमक होती. पवारांच्या संस्कारांमधून ते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध जोरदार बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीतल्या अंतर्गत राजकारणाचे वाभाडे काढत होते. भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले नाही, पण स्वतःला मिळाले म्हणून माणिकराव खुश झाले होते. पण फसवणूक प्रकरणात शिक्षा झाल्याबरोबर माणिकरावांचे मंत्रीपद अडचणीत आले.
इतकेच नाहीतर त्यांची आमदारकीच धोक्यात आली. त्याबरोबर माणिकरावांची भाषा एकदम “सरळ” झाली. ते छगन भुजबळ किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरुद्ध किंवा शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध बोलायचे थांबले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती पत्करली.
पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना माणिकराव म्हणाले, आम्ही निवडून आलो, त्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम भरला. तुमच्या जाण्याने या सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही नीट काम करा, नाहीतर घरी जा, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणाले. त्याचबरोबर आमचे ओएसडी आणि पीएस मुख्यमंत्र्यांनी स्वतःच नेमले. त्यामुळे आमच्या हातातही काही राहिले नाही. त्यांनी आम्हाला १०० दिवसांचा कार्यक्रम दिला.
तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली. ही जबाबदारी पूर्ण केली नाही तर घरी जावे लागेल, असे आम्हाला सांगितले. त्यामुळे आमच्या सकट आमच्या अधिकाऱ्यांना नीट काम करावे लागत आहे, पण त्यामुळे जनतेची चांगली सोय होत आहे. मंत्री पदाच्या खात्यांमध्ये वेगवेगळे वाटप झाले असले तरी आम्ही समन्वय राखून काम करू, अशी ग्वाही माणिकराव कोकाटे यांनी दिली. किंबहुना त्यांना ती द्यावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App