सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने नागपूरात ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या शुभारंभ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या नागपूरातील शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. As long as the moon and the sun exist the history of Chhatrapati Shivaji maharaj
यावेळी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रचंड आकर्षण, ऊर्जा आणि जोश आहे. हे नाट्य पाहताना ती ऊर्जा आपल्या धमन्यांमध्ये वाहत असल्याचा प्रत्यय येतो. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या महानाट्याची सुरुवात केल्यामुळे सामान्य माणसांना शिवराय समजले. असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
याशिवाय मुघलांचे अत्याचार थांबविण्याचे काम शिवरायांनी केले. म्हणूनच महाराज आपल्यासाठी युगपुरुष आहेत. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास देश अत्यंत बलशाली होईल. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जगभरात शिवरायांचा इतिहास गाजत राहील. शिवरायांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा हा एक चांगला उपक्रम आहे. असंही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App