एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अतिरिक्त 90 दिवसांची मुदत मागितली आहे. खरे तर या प्रकरणात 2 एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल होणार होते. आता एनसीबीने न्यायालयाकडे 90 दिवसांची मुदत मागितली आहे.Aryan Khan Drugs Case: NCB seeks 90-day extension to file chargesheet, Supposed to be filed on April 2
वृत्तसंस्था
मुंबई : एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अतिरिक्त 90 दिवसांची मुदत मागितली आहे. खरे तर या प्रकरणात 2 एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल होणार होते. आता एनसीबीने न्यायालयाकडे 90 दिवसांची मुदत मागितली आहे.
गतवर्षी ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. आता एनसीबीच्या विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयात केली आहे.
Aryan Khan drugs-on-cruise matter | SIT of NCB seeks 90-day additional time from Mumbai Sessions Court to file chargesheet in the matter. It was supposed to file the chargesheet by 2nd April. pic.twitter.com/fKMvjq5WEo — ANI (@ANI) March 28, 2022
Aryan Khan drugs-on-cruise matter | SIT of NCB seeks 90-day additional time from Mumbai Sessions Court to file chargesheet in the matter. It was supposed to file the chargesheet by 2nd April. pic.twitter.com/fKMvjq5WEo
— ANI (@ANI) March 28, 2022
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मुंबईतील एका क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आर्यन खानवर ड्रग्ज बाळगणे, विक्री करणे आणि खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एनसीबीने त्याला अटक करून कारागृहात पाठवले. 26 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 28 ऑक्टोबरला आर्यन खानला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाला होता.
एनसीबीने आरोपपत्रासाठी वेळ मागितला
आपल्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात ड्रग्जशी संबंधित गुन्हा करण्याच्या कटाचा कोणताही पुरावा न्यायालयाला सापडला नाही. त्यांनी म्हटले की, व्हॉट्सअॅपच्या संभाषणातून काहीही सिद्ध होत नाही. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला.
आर्यन खानविरोधात पुरावे मिळाले नाहीत
दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या विरोधात असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, ज्यामुळे त्याचा कटात सहभाग असल्याचे सिद्ध होते. एनसीबीच्या अधिकाऱ्याने हे फेटाळले आहे. एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय कुमार सिंह यांनी मीडिया रिपोर्ट्सना केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App