प्रतिनिधी
मुंबई : कायदा पाळणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई करून त्यांची धरपकड करणार, पण मुंबईतल्या 135 मशिदींवर पहाटे पाच वाजता भोंग्यांवर अजान लावली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांच्यावर काय कारवाई करणार??, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना केला आहे. 4 तारखेच्या भोंगा हटाव आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे यांनी आपले निवेदन पत्रकार परिषदेत केले परंतु हा प्रश्नोत्तराचा तास नाही असे सांगून यांनी पत्रकार परिषदेत थांबवली. Arrest of Mansainiks, but what action will be taken against 135 mosques for breaking the law
– 135 मशिदींकडून कायदेभंग
माझ्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश तोडून पहाटे 5.00 वाजता भोंग्यावर लावली. त्यांच्यावर मुंबई पोलिस काय कारवाई करणार आहेत??, हा प्रश्न मी विचारतो आहे, असे राज ठाकरे म्हणाले. भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही. जोपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवत नाही. तोपर्यंत हा विषय चालूच राहणार आहे. ज्या मुल्ला-मौलवी यांनी हा विषय समजून घेऊन भोंग्यांचे आवाज कमी ठेवले त्यांचे मी आभार मानतो. पण ज्या 135 मशिदींवर भोंग्यांवर पहाटे 5.00 वाजता अजान लावली गेली, त्यांच्यावर मुंबईचे पोलिस काय कारवाई करणार आहेत??, असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
– 135 फक्त मुंबईतला आकडा
धर्म घरात ठेवा. मंदिरात जाऊन प्रार्थना करा. मशिदीत प्रार्थना करा.षपण त्याचा त्रास इतरांना देऊ नका, हीच आमची भूमिका आहे आणि ती यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मनसैनिकांनी कायद्याचे पालन केले आहे, त्या मनसैनिकांची धरपकड केली पण ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलला त्या 135 मशिदींवर कारवाई अद्याप झालेली नाही, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर कायदा मोडणाऱ्या मशिदींचा 135 हा आकडा मुंबईतला आहे. महाराष्ट्रातले आकडे स्थानिक पोलीस कमिशनर बघतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
– प्रश्नोत्तरे नाहीत
या वेळी राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी बाहेरच निरोप पाठवला होता की या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरे होणार नाहीत. फक्त माझे निवेदन होईल. हे तुम्हाला समजले नाही का??, असा उलट सवाल राज ठाकरे यांनी करून पत्रकार परिषद थांबवली. त्यामुळे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत. यापैकी महत्त्वाचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर बांधली यासंदर्भातला असणार होता. परंतु, तो प्रश्न पत्रकारांनी विचारला नाही. त्यामुळे त्यावर राज ठाकरे यांचे नवीन भाष्य समोर आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App