नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.त्यानंतर गाडीतून दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर हल्ला केला.’Arrest Nitesh Rane, he carried out the attack’; Demand of Satish Sawant
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला भाजपचे नेते नितेश राणे यांनी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे जिल्हा बँकेच्या पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.
‘निवडणूक जिंकण्यासाठी कोणाचाही ते जीव घेतील, नरबळी घेतील.हा हल्ला राजकीय असून तो नितेश राणे व त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनी घडवून आणल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत जर नितेश राणेंना अटक झाली नाही तर शिवसेना आंदोलन करणार,” असा इशारा ही सावंत यांनी दिला आहे.
सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीत जीवघेणा हल्ला झाला. नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.त्यानंतर गाडीतून दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर हल्ला केला. हल्ला करून मारेकरी कनेडीच्या दिशेने पळाले.या घटनेनंतर जखमी परब यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App