नाशिक : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेले आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनामुळे आली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे मतदार याद्यांविषयी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी तक्रारींचा पाऊस पाडला. उद्धव ठाकरे सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या कार्यालयात केले. शरद पवार एकच दिवस तिथे जाऊन आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आणि राज ठाकरेंना सुद्धा आपल्याबरोबर घेतले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगामध्ये तिथे पोहोचले होते. पण या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आणि शरद पवारांचे आठ खासदार नेमके कुठे होते??, हा सवाल समोर आला. कारण शिष्टमंडळामध्ये खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई दिसले. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. पण उद्धव ठाकरेंचे बाकीचे 7 खासदार कुठे होते??, त्याचबरोबर शरद पवारांचे आठ खासदार कुठे होते हा खरा सवाल आहे.
वास्तविक ठाकरे आणि पवारांच्या दोन्ही पक्षांची मिळून खासदार संख्या काँग्रेसच्या बरोबरीची संख्या आहे. काँग्रेसचे सुद्धा चिन्हावर 13 खासदार महाराष्ट्रात निवडून आले. पण ते खासदारही जवळपास defunct झालेत. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागलेले दिसतच नाही. नेमकी तशीच अवस्था ठाकरे आणि पवारांच्या खासदारांची दिसून येऊ राहिली आहे.
– खासदारांचे काही कर्तव्य आहे की नाही??
वास्तविक स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी आणि छोट्या – मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेचे 48 मतदारसंघांमध्ये कष्ट घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या 31 नेत्यांना लोकसभेचे तोंड दिसले, म्हणजे ते खासदार झाले. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष कामाला लागण्याचे खासदारांचे कर्तव्य नाही का?? ते लोकसभेसारखेच मैदानात उतरून स्थानिक पातळीवर पक्षांचे मेळावे पक्षांचे वेगवेगळे उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत का??, की आपण खासदार झालो म्हणजे आपले हात तुळईला लागले. आपण फक्त दिल्लीत अधिवेशनाला हजर राहायचे. स्थानिक पातळीवर उतरायचेच नाही, असा त्यांचा समज झाला आहे का??, असे सवाल त्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे त्या सवालांची उत्तरे द्यायची जबाबदारी आपली आहे असे ते खासदार मानत नाहीत. काँग्रेस बरोबरच ठाकरे पवारांचे खासदारही जमिनी स्तरावर कुठे काम करताना अजून तरी दिसत नाहीत. निवडणुकीच्या मैदानात त्यातून उतरलेले दिसत नाही अन्यथा फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा त्यांचे दुसऱ्या फळीतलेच नेते मेळावे घेताना दिसले नसते. सगळे खासदार आणि उरले सुरलेले आमदारही आपापल्या मतदारसंघात मेळावे किंवा पक्षांचे उपक्रम घेताना दिसले असते. पण तसे काही चित्र अजून महाराष्ट्रात दिसून राहिलेले नाही.
– खासदार आपापल्या कोषात मग्न
उलट हे सगळे खासदार आपापल्या कोषा मध्ये आणि राजकीय कामांमध्ये मग्न असून स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही जबाबदारी आहे, ती आपल्या पक्ष नेतृत्वाची आहे. आपला त्याच्याशी फारसा काही संबंध नाही. पक्षाच्या नेतृत्वाने सांगितल्याशिवाय हालचाली करायचे कारणच नाही, असा आव आणून बसले आहेत. म्हणून तर किरकोळ कुठे मोर्चात सामील हो किंवा जयंत पाटलांच्या समर्थनासाठी सभेत सामील हो, किंवा सर न्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकणाऱ्याच वकिलाचा राज्यघटनेची प्रत देऊन निषेध करणे यापलीकडे महाविकास आघाडीचे खासदार सक्रिय दिसत नाहीत. निदान ते सक्रिय असल्याच्या तशा बातम्या तरी कुठे आलेल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App