ऐतिहासिक घटना; अर्चना अत्राम बनल्या राज्यातील पहिल्या महिला एसटी बस चालक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वचस्तरातून कौतुक आणि शुभेच्छा

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला बस चालक म्हणून अर्चना अत्राम यांची निवड झाली आहे. त्यांनी सासवड  ते  नीरा या मार्गावर बस चालवली. त्यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. Archana Atram became the first woman ST bus driver in the state

अर्चना अत्राम या सासवड बस डेपोमधून बस घेऊन नीराकडे निघाल्या, तेव्हा बसमध्ये १७ प्रवासी होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सासवड डेपोमधून रूजू झाल्या. या अगोदर त्या वाहक म्हणून काम करत होत्या. अर्चान अत्राम यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

फडणवीसांकडून कौतुक आणि शुभेच्छा –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे कौतुक केले असून, ‘’अवघ्या जगाचे सारथ्य सहजतेने करणाऱ्या ‘स्त्री शक्ती’ला आपल्या ‘लाल परी’चे वावडे का असेल?  अर्चनाताई आत्राम यांनी सासवड ते निरा (जि. पुणे) या मार्गावरील ‘एसटी’ नुकतीच चालवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला चालक होण्याचा मान आत्राम यांना मिळाला, याचे आम्हा सर्वांना कौतुक आणि अभिमान आहे ! आता श्रीमती आत्राम यांच्या एसटीमध्ये, कंडक्टरही महिला आणि त्यांच्याकडून ५० टक्के सवलतीचे अर्धे तिकीट घेतलेल्या सगळ्या प्रवासीही महिलाच…असे चित्र पण लवकरच दिसेल ! आत्राम यांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!’’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला –

‘’नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!’’ अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अर्चना अत्राम यांचे कौतुक केले.

Archana Atram became the first woman ST bus driver in the state

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात