नागपूरच्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात 20,000 चौ.मी. जागेत परफॉर्मन्स गॅलरी तयार होणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Akhand Bharat मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’शी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्पांना तत्वतः मंजुरी देण्यात आली.Akhand Bharat
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो माईल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 45 कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. नागपूर हे अखंड भारताच्या केंद्रस्थानी कसे होते याबाबत माहिती देणारे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’ येथे उभारले जाणार आहे. नैसर्गिक प्रकाशाचा वापर करत संग्रहालय, सोयी-सुविधा व वाहनतळ विकसित केला जाणार असून, भविष्यात महानगरपालिका याची देखभाल करणार आहे. तसेच नागपूरच्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात 20,000 चौ.मी. जागेत परफॉर्मन्स गॅलरी तयार होणार असून, यामध्ये ‘ॲकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. एकूण 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासास मंजुरी मिळाली असून त्यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बाबुलखेडा (ता. कामठी) येथे 81.6 एकर जागेवर नवीन कारागृह उभारण्याच्या प्रस्तावास देखील मान्यता दिली. यासाठी दिल्ली, पालघर व तळोदा येथील कारागृहांच्या आर्किटेक्चरल डिझाईनचा अभ्यास करून कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, कारागृह सदनिकाही बांधण्यात येणार आहेत. या बैठकीमध्ये मोरभवन आणि गणेशपेठ येथील बस स्थानकांचा पुनर्विकास करण्यावर सविस्तर चर्चा झाली. मोरभवन येथे खाजगी व शहर बससेवा तर गणेशपेठ येथे एसटी व शहर बससेवेसाठी नव्या सोयीसुविधा तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय ‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास मुख्यमंत्री यांनी यावेळी तत्वतः मान्यता दिली.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App