विशेष प्रतिनिधी
मुंबई : समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती .परंतु समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत.
दरम्यान मुंबई अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाचे (आयआरएस ) अधिकारी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे विभागीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अमली पदार्थ तस्करांवर कारवाई केली होती. क्रुझवरील ड्रग्स कारवाईदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा सापडल्यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App