नाशिक : समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटना यांच्याकडून जास्तीत जास्त तुष्टीकरण; हीच भाजपसाठी राजकीय विस्ताराचे भरण पोषण!!, असला प्रकार सध्या देशाचा राजकारणात सुरू आहे.
छावा सिनेमाने धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांचा औरंगजेबाने केलेला छळ याचे वास्तव समोर आणल्यानंतर देशात हिंदुत्वाचे नवे वारे शिरले. तरुणाईला देशाच्या इतिहासाचे धगधगते वास्तव समजले. पण त्यामुळे आत्तापर्यंत प्रस्थापित राहिलेले राजकीय पक्ष आणि संघटना पूर्ण अस्वस्थ झाल्या. नव्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाला सामोरे कसे जावे याविषयी त्यांच्या प्रचंड संभ्रम निर्माण झाला आणि त्यातूनच समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटनांचे जास्तीत जास्त मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकीय पिल्लू बाहेर आले.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून नागपुरात दंगल पेटवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणायचा प्रयत्न झाला पण तो फडणवीस यांनी एका झटक्यात हाणून पाडला. उलट दंगलीत झालेले नुकसान दंगेखोरांकडूनच भरून घेऊ प्रसंगी त्यांचे प्रॉपर्टी विकून आणि नुकसान भरून काढू, असा फडणवीसांनी दम भरल्यानंतर महाराष्ट्रात औरंगजेबाच्या बाजूने छुप्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस + काँग्रेस असल्या पवार संस्कारित प्रवृत्तींचे अवसानच गळाले. कारण तिथे थेट कोट्यावधी रुपयांच्या खर्चाचा मुद्दा आल्याबरोबर पवार संस्कारितांनी आपली तोंडेच आवरून शिवून टाकली. छोट्या – मोठ्या मुद्द्यांवर ते बडबड करायला लागले.
– राणा संग आणि बाबर
पण त्या पलीकडे जाऊन औरंगजेबाचा तापलेला मुद्दा खऱ्या अर्थाने समाजवादी पार्टीला टोचला, कारण त्यातून समाजवादी पार्टी आणि उत्तर प्रदेश मधल्या मुस्लिम संघटनांचे राजकारणच उद्ध्वस्त झाले. म्हणून मग समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे खासदार रामजीलाल सुमन यांनी थेट हिंदुत्ववाद्यांवर वेगवेगळ्या हल्ले चढविले. रामजीलाल सुमन यांनी राणा संग म्हणजेच राजस्थानचे महान वीरयोद्धे संग्राम सिंह यांना मुगल सम्राट बाबराचा हस्तक ठरविले. बाबराने हिंदुस्थान वर आक्रमण केले नव्हते, तर राणा संग यांनी बाबराला निमंत्रण दिले होते म्हणून बाबर भारतात आला होता, असा “जावईशोध” रामजीलाल सुमन यांनी लावला. रामजीलाल सुमन यांच्या “जावईशोधाला” राजस्थानातल्या देशप्रेमी जनतेने तडाखा दिला. तिथे भाजपचे सगळे मंत्री, आमदार, खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर तुटून पडले.
– अखिलेश यादवांचे तर्कट
पण त्यापलीकडे जाऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वेगळाच शोध लावला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणे, डाव्या पायाच्या अंगठ्याने तिलक करून झाला होता हा तो शोध लावला. त्याबद्दल भाजपने माफी मागावी आणि मगच औरंगजेबाविषयी बोलावे, असे अखिलेश यादव म्हणाले. त्यासाठी त्यांनी चर्चचा हवाला दिला. गॅलिलिओने पृथ्वी सपाट आहे असा शोध लावल्यावर चर्च ने त्याला फाशी दिली होती पण 400 वर्षांनी गॅलिलिओची माफी मागितली तशीच भाजपने माफी मागावी, असे तर्कट अखिलेश यादव यांनी लढविले. पण या सगळ्यात समाजवादी पार्टीचे जास्तीत जास्त मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरणच उघड्यावर आले. त्यातून मुस्लिम संघटनांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घातला. पण त्यांची इफ्तार पार्टी यशस्वी व्हायची राहिली नाही.
या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र कुठली इफ्तार पार्टी आयोजित केली नाही. किंवा तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मागे जाऊन मुस्लिम तुष्टीकरणाचे प्रकार अवलंबले नाहीत. उलट संघटनात्मक पातळीवरचा विस्तार संघटनात्मक निवडणुका आणि त्याहीपेक्षा संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पुढच्या वर्षभरातल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आखणी या विषयावर भर दिला. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी औरंगजेब नव्हे, तर महाराणा प्रताप आणि दारा शुकोह हे भारताचे “आयकॉन” होऊ शकतात, असे ठामपणे सांगून धर्मनिरपेक्ष पक्षांच्या अजेंड्याला पुरता सुरंग लावला.
तिरुपतीच्या बालाजी मंदिर आणि संस्थानात फक्त हिंदूंनाच नोकरी आणि काम करण्याची संधी मिळेल असे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर करून टाकले. यातून त्यांनी हिंदू अजेंड्यालाच बळ दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App