ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा कुटुंबीयांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस!

२० मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बजावले समन्स

प्रतिनिधी

अलीबाग : राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नोटीस बजावली आहे. राजन साळवी यांच्या पत्नी आणि भावासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना २० मार्च रोजी चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. anti corruption bureau has served a notice to  MLA Rajan Salvis family in a disproportionate assets case

मागील दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत सध्या एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.  त्यांच्या घराचीही पाहणी करण्यात आली होती. तसेच,  त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं.

अमृता फडणवीसांना १ कोटीची लाच ऑफर अन् धमकी; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा दाखल!

आतापर्यंत तीन वेळा राजन साळवी अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.  आता त्यांच्या कुटंबीयांनाही एसबीने नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

काय म्हणाले राजन साळवी? –

“आजच सकाळी माझी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी यांना एसीबीची नोटीस आली आहे. त्यांना २० मार्चला चौकशीसाठी अलिबागच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. मी यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे की, सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे. राजन साळवी काय आहे, हे माझ्य मतदारसंघाला माहीत आहे. नोटीस आल्यावरच मी जाहीर केलं होतं की, मी याप्रकरणात संपूर्ण सहकार्य करेल आणि तसं करतोय.”

anti corruption bureau has served a notice to  MLA Rajan Salvis family in a disproportionate assets case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात