विशेष प्रतिनिधी
मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेसारखाच शिवसेनेचा लाडका असलेला आणखी एक पोलीस अधिकारी मनसुख हिरेन हत्याप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.Another dear police officer of Shiv Sena in the midst of suspicion, connection with Mansukh Hiren murder case
हिरेन हत्याप्रकरणात आता चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्माचेही कनेक्शन समोर येत आहे. हिरेन यांच्या हत्येपूर्वी एक दिवस सचिन वाझेची शर्मा याच्यासोबत बैठक झाली होती. मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या झाली.
त्याच्या आदल्या दिवशी सचिन वाझेसोबत प्रदीप शर्मा याची अंधेरीतील चकाला येथे एक बैठक झाली होती. त्यामुळे हिरेन हत्येत शर्मांचा सहभाग होता का, यादृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. एनआयएने बुधवारी शर्मांकडे कसून चौकशी केली.
प्रदीप शर्मा १९८३ च्या उपनिरीक्षक बँचचे अधिकारी आहेत. ९०च्या दशकात मुंबई पोलिसांनी अनेक एन्काऊंटर केले होते. त्यातून शर्मा प्रसिध्दीस आले होते. मात्र, २००८च्या लखन भय्या फेक एन्काऊंटरमध्ये शर्मांना दोषी ठरवून बडतर्फ करण्यात आले होते.
मात्र मॅटने त्यांना दोषमुक्त करून सेवेत घेण्याचे आदेश दिले. त्याबाबत उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना साडेतीन वर्षांपूर्वी त्यांना सेवेत घेऊन ठाणे खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली.
परमबीर सिंग त्या वेळी ठाण्याचे आयुक्त होते. त्यानंतर शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर वसईतून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा ठाकूर यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या सीबीआयच्या अधिकाºयांनीनिलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी करण्याकरिता त्याचा ताबा मिळावा,
यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे. बुधवारी विशेष न्यायालयाने सीबीआयला वाझेची चौकशी करण्याची परवानगी दिली. तसेच न्यायालयाने वाझेच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App