मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एकाची आत्महत्या; अंबेजोगाईत पाण्याच्या टाकीवरून उडी मारली!

पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणासाठी  केली घोषणाबाजी, मनोज जरांगेंशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली

विशेष प्रतिनिधी

बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातील तरूण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. आज बीड जिल्ह्यातील अंबोजगाई येथे एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. Another commits suicide to demand Maratha reservation Unexpectedly jumped from the water tank

आरक्षणाची मागणी करत एकाने काल एकाने अंबोजगाईमधील गिररवली येथे रात्री सव्वाबारा वाजता पाण्याच्या  टाकीवरून  उडी मारून  आत्महत्या केली. शत्रुघ्न अनुरथ काशीद (वय ४३, रा. गिरवली) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

कालरात्री हा व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला आणि तिथून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी  केली. एवढच नाहीतर मनोज जरांगेंशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून काशीद यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याने तेवढ्यात उडी मारून आयुष्य संपवलं. आज शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ  अंबोजगाई  जिल्ह्यातही साखळी  उपोषण सुुरू  आहे. याशिवाय  विविध  मार्गाने मराठा बांधव  आंदोलन करून  आरक्षणाची मागणी करत  आहेत.

Another commits suicide to demand Maratha reservation Unexpectedly jumped from the water tank

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात