विशेष प्रतिनिधी
बीड : बीडच्या कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. Khokya Bhosale
यात आश्चर्याची बाब, म्हणजे जो खोक्या भोसले काहीच दिवसांपूर्वी तब्बल २० गुन्ह्यांच्या आरोपांमुळे गजाआड गेला होता. त्याच खोक्याने कारागृहात गांजा मागवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
नेमका खोक्या भोसलेचा विषय काय?
काही महिन्यांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसलेचा मारहाण करतांनाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात खोक्या एका व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत लाथा बुक्यांनी, लाकडी बॅटने मारहाण करत होता. विशेष म्हणजे त्या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना खोक्याने, “त्याने माझ्या मित्राच्या बायकोची त्यांनी छेड काढली, म्हणून मी त्याला मारहाण केली”, असं म्हणत स्वत:च्या वागण्याचं समर्थनही केलं होतं. एवढंच नाही, तर तेव्हा सुरेश धसांचा वरदहस्त असलेल्या खोक्यावर मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, वन्य प्राण्यांची तस्करी, यासह २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते. एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या खोक्याला पोलिसांनी प्रयागराजहून अगदी फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतलं. Khokya Bhosale
त्यानंतर कित्येक दिवस खोक्या पोलीस कोठडीतच राहिला. कालांतराने काही गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मंजूर झाला. पण तरी देखील त्याच्यावर मारहाणीचे खटले सुरूच असल्यामुळे त्याचा मुक्काम तुरुंगातच कायम राहिला. एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊनही गजाआड असलेला खोक्या अजूनही सुधारायचं नाव घेत नाही. कारण आता याच खोक्याने कारागृहात गांजा मागवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
बीड पोलीस स्टेशनमधले सुभेदार बलभीम चिचाणे आणि हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज यांना ७ नंबरच्या बराकमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानुसार त्यांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिंटू मिठ्ठू गायकवाडची झडती घेतली. तेव्हा त्याच्या कपड्यांमध्ये एक चिरलेला रबरी बॉल सापडला आणि त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ देखील आढळला. एवढंच नाही, तर तेव्हा त्याच्या पँटच्या खिशात हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थसदृश मुद्देमाल सापडला. Khokya Bhosale
त्यानंतर पोलिसांनी तो सगळा मुद्देमाल जप्त केला. तुरुंगात असलेल्या चिंटू मिठ्ठू गायकवाडच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला. यात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला, तेव्हा यामागचा सूत्रधार खुद्द खोक्या भोसलेच असल्याचं दिसून आलं. तेव्हाच पोलिसांनी खोक्यासह आणखी तीन आरोपींवर तुरुंगात अमली पदार्थांचं सेवन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App