विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मला दिवसाला 700 ते 800 कॉल केले जात आहेत. या माध्यमातून मला धमकी देण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. इतकेच नाही तर सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून माझ्यावर अश्लील कमेंट केल्या जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. नवीन एसटी स्थापन करा, तसेच त्यासाठी राज्याबाहेरून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.Anjali Damania
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात आजपर्यंत बोललेले नाही. वंजारी समाजाबद्दल देखील मी कधीही बोललेले नाही. मात्र, परळी मध्ये जे सर्व सुरू आहे त्या विरोधात मी बोलले. मात्र माझे स्टेटमेंट तोडून मोडून समाज माध्यमावर टाकले जात आहे. त्यामुळे मला धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते धमकीसाठी फोन करत आहेत. फोन करणारे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात आपण लवकरच पोलिस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
राज्य सरकारमध्ये कोणत्याही जिल्ह्यासाठी बिंदू नामावली नावाचा प्रकार असतो. बिंदू नामावलीनुसार सर्व समाजातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, बीडमध्ये अशी नियुक्ती करण्यात आली आहे का? यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीडमध्ये नियुक्त असलेल्या सर्व अधिकार्यांची तात्काळ बिंदू नामावलीनुसार नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
एसआयटी आणि सीआयडी तपास धुळ फेक असल्याचा आरोप
बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी बीड मधील अनेक प्रकरणात धनंजय मुंडे यांचा समावेश असल्याचा आरोप केला. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या विरोधातील आंदोलनात देखील त्यांनी सहभाग नोंदवला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेली एसआयटी आणि सीआयडी तपास धुळ फेक असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App