विशेष प्रतिनिधी
मुंबई: Anjali Damania मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आज पार पडला. मात्र, यंदाच्या मेळाव्यात एका प्रसंगामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही तरुणांच्या हातात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडे फोटो झळकले. यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना गॉन केस म्हटले.Anjali Damania
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराडचे पोस्टर्स झळकावण्यात आले. काही तरुणांनी आपल्या हातात वाल्मीक कराडचे फोटो घेतले होते. “We support walmik anna, कराड आमचे दैवत” असा मजकूर या पोस्टरवर होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे काहीसा वाद निर्माण झाला आहे.Anjali Damania
नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया?
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला. मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील, तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे, असेही दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडे गॉन केस
यावर तुमचे म्हणणे काय? पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती गॉन केस आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App