Anjali Damania, : पार्थ पवारांवर FIR झाला की अजित पवारांचा राजीनामा नक्की; अंजली दमानियांचा दावा; नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणी महाजनांवर टीका

Anjali Damania,

विशेष प्रतिनिधी

पुणे : Anjali Damania, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. “एफआयआरमध्ये अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट झालेच पाहिजे. एकदा का पार्थ यांचे नाव गुन्ह्यात आले की अजित पवार यांना राजीनामा द्यावाच लागेल आणि त्यासाठीच माझा लढा सुरू आहे,” असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.यासोबतच दमानिया यांनी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत.Anjali Damania,

अंजली दमानिया म्हणाल्या, सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि राजकारण्यांसाठी कायदा वेगळा झाला आहे, हीच महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शीतल तेजवानीला पुण्यातील महार वतनाच्या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात झालेली अटक फक्त दिखावा असून पार्थ पवारचे नाव सुद्धा एफआयआरमध्ये नाही. सरकारी जमीन 1800 कोटींची खाऊनही त्याला अटक होत नाही.Anjali Damania,



अंजली दमानिया यांनी केवळ सत्ताधाऱ्यांवरच नव्हे, तर विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पार्थ पवार यांच्या एफआयआरसाठी विरोधी पक्षांनीही आक्रमक मागणी करणे गरजेचे होते. काँग्रेस हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे समजते, मात्र इतर विरोधी पक्ष काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिग्विजय पाटील पळून गेले तर जबाबदार कोण?

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू असतानाच दिग्विजय पाटील यांना जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “चौकशीला पुन्हा हजर राहण्याची ग्वाही सगळेच देतात. पण एकदा देश सोडून पळून गेल्यावर परत किती जण येतात? दिग्विजय पाटील परत आले तर ठीक, पण नाही आले तर काय? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय. त्यातील एक माणूस दाखवा, जो परत आलाय,” असे दमानिया म्हणाल्या.

परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे

दिग्विजय पाटील हे स्वत:हून गेलेत की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिले हे कळत नाहीये. मामेभाऊ म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला गेले असतील, हे आम्ही समजू शकतो. पण आताच्या घडीला त्यांना रोखणे गरजेचे होते. कारण त्यांच्यावर असलेल्या एफआयआरमध्ये ७ ते १४ वर्षांची शिक्षा असताना, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना बाहेर देशात जाऊ दिले नाही पाहिजे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना पाटील यांना परदेशात जाऊ दिले त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

99 टक्के भागीदाराचे नाव एफआयआरमध्ये का नाही?

यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, मी आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. जमीन खरेदी करणारी ‘अमेडिया’ ही कंपनी असून त्यात पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. असे असताना एफआयआरमध्ये केवळ 1 टक्का भागीदारी असलेल्या आणि फक्त सहीचे अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव टाकून काय उपयोग? मुख्य भागीदाराचे नाव गुन्ह्यात आलेच पाहिजे, अशी मागणी त्या फडणवीसांकडे करणार आहेत.

नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे षडयंत्र?

नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामच्या नावाखाली ती जमीन बळकावून तिथे मुंढव्यासारखे षडयंत्र केले जातंय, असे मला कळतंय. हे षडयंत्र गिरीश महाजन करत आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण समर्थन देत आहेत. नाशिकची जनता तपोवनासाठी, तिथल्या झाडांसाठी लढत आहेत. छोटी छोटी मुले झाडांना पकडून उभी आहेत. तरी सुद्धा या लोकांना पैशाची हाव सुटली आहे. परंतु, नाशिककर हे खपवून घेणार नाहीत. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने नाशिककरांच्या पाठिशी ताकदीने उभे राहायला पाहिजे. हा केवळ नाशिकचा विषय नाही, तर सगळीकडे अशीच झाडे तोडली जात आहेत. जमिनी भूईसपाट करून बिल्डर आणि राजकारण्यांच्या घशात जात आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

Anjali Damania Targets Ajit Pawar Parth Pawar FIR Resignation Tapovan Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात