
सीबाआयाने रामोड यांना १० जून रोजी लाच घेताना अटक केली होती.
विशेष प्रतिनिधी
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलेले आयएएस अधिकारी व अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर राज्य सरकारने निलंबित केले आहे. मागील आठवड्यातच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला गेला होता. Anil Ramod an IAS officer who was caught accepting a bribe of eight lakhs is finally suspended
सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने, अनिल रामोड यांना विभागीय आयुक्त पदावरून निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. सीबीआयच्या मागणीनंतर विभागीय आयुक्तलयाने रामोड यांच्या निलंबनासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला गेला आणि रामोड यांच्या आदेशाचे निलंबनाचे आदेश निघाले.
आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबाआयाने रामोड यांना १० जून रोजी रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये रोकड आणि त्यांच्या घरावरील छाप्यात सहा कोटी रोख रक्कम, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि पत्नीच्या नावावर ४५ लाखांपेक्षा अधिकची रक्कम सीबीयआला आढळून आली.
निलंबनानंतरही रामोड यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. तसेच, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे आदेशात नमूद आहे.
Anil Ramod an IAS officer who was caught accepting a bribe of eight lakhs is finally suspended
महत्वाच्या बातम्या
- साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा
- अभिमानास्पद : जोरदार वारा, मुसळधार पावसात वॉशिंग्टन विमानतळावर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ मोदी भिजत उभे राहिले
- PM मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते का??; वाचा नेहमी “मोदी विरोधी” भूमिका मांडणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सचे विश्लेषण
- हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर झाले PM मोदींचे चाहते, म्हणाले- पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतीक