– २ सप्टेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे लोकायुक्तांचे परबांना आदेश
प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती परिवहन मंत्री अनिल परब यांची बढती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी होणार आहे. सक्तवसूली संचलनालय ED पाठोपाठ लोकायुक्त चौकशीचे शुक्लकाष्ट परबांमागे लागले आहे. Anil Parab in trap of promotion inquiry trap of lokayukt
तसे आदेश स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत. लोकायुक्तांना हा चौकशीचा आदेश दिला आहे. २ सप्टेंबर रोजी लोकायुक्तांकडे चौकशीला हजर राहण्याचा आदेश लोकायुक्तांनी दिला आहे. यासंबंधीची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
– ऑनलाईन होणार चौकशी!
लोकायुक्तांनी चौकशीसाठी दिलेल्या आदेशात ही चौकशी ऑनलाईन होणार आहे. राज्यातील परिवहन विभागातील उप प्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग, वर्धा अधिकारी बजरंग खरमाटे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संगनमताने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रकरणी लाखो रुपये वसूल केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात येणार असल्याचे लोकायुक्तांच्या पत्रात म्हटले आहे. दिले आहेत.
श्री. बजरंग खरमाटे, RTO श्री. अनिल परब, परिवहन मंत्री यांच्या संगनमताने अधिकाज्यांच्या बदल्या…. प्रकरणी केलेल्या भ्रष्टाचाराविरुध्द किरीट सोमैया यांची तक्रार
मा.राज्यपाल यांचे आदेशानुसार मा. लोकायुक्त यांनी सुरु केलेली चौकशी/सुनावणी
दिनांक 2/9/2021 रोजी दुपारी 12 वाजता PIC.TWITTER.COM/PCUW680PWL
— KIRIT SOMAIYA (@KIRITSOMAIYA) AUGUST 31, 2021
ईडीसमोर गैरहजर राहणार!
दरम्यान ईडीने मंगळवारी, सकाळी ११ वाजता परिवहन मंत्री परब यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. तशी नोटीस ईडीने दिली आहे. मात्र मंत्री परब हे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्याआधी परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली, तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली.
– कोण आहेत बजरंग खरमाटे?
बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि २५-३० लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App