प्रतिनिधी
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विविध गुन्ह्यांखाली ते सध्या आर्थर रोडमध्ये गजाआड आहेत. याप्रकरणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असता त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. हा ठाकरे – पवार सरकारलाही मोठा झटका मानला जात आहे. Anil Deshmukh’s bail application rejected by special court
100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आरोप झाल्यानंतर देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. त्यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. तसेच देशमुख यांचीन मालमत्ता जप्तीचा आदेश देण्यात आला होता. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App